Breaking

नाशिक मध्ये राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समितीच्या वतीने स्मृती दिन कार्यक्रम


नाशिक : राजर्षी शाहूमहाराज यांचे स्मृती शताब्दी निम्मीत्त दि ६ मे २०२२ रोजी नाशिकमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.


राजर्षी शाहूमहाराज ह्यांचे नाशिकशी अत्यंत जिव्हाळ्याचे सबंध आहेत. दि १५ एप्रिल १९२० रोजी महाराजांनी नाशिकला भेट दिली होती. नाशिक परिसरातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे ह्या करिता तीन वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली होती. त्यातील उदोजी मराठा बोर्डिंग, वंजारी बोर्डिंग आणि छत्रपती शाहूमहाराज बोर्डिंग ह्या वस्तीगृहाना महाराजांनी भेट देऊन त्यांना भरघोस आर्थिक सहाय्य दिले आहे. त्या वेळेचे त्यांचे ऐतिहासिक भाषण प्रसिद्ध आहे. त्या स्मृती जागविण्या साठी नाशिक शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मिळून राजर्षी शाहूमहाराज स्मृती शताब्दी समिती नाशिकची निर्मिती करण्यात आली आहे.


समितीच्या वतीने ६ मे रोजी सकाळी १० वा.उदोजी मराठा बोर्डिंग, गंगापूर रोड, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था कार्यालया समोरील शाहू महाराज पुतळा येथे १०.३० वा., वंजारी बोर्डिंग गंगापूर रोड येथे सकाळी ११.०० वा आणि छत्रपती शाहू बोर्डिंग येथे १२.०० वा. अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे समितीच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहेकी दि. ६ मे रोजी सकाळी १० वा आपण ज्या ठिकाणी असाल त्याठिकाणी १०० सेंकद उभे राहून महाराजाना अभिवादन करावे.


स्मृती शताब्दी समिती पुढील वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करणार असून त्या साठी घेतलेल्या बैठकीत समितीचे गठन करण्यात आले आहे. समितीचे कॉम्रेड राजू देसले (अध्यक्ष), जयवंत खडताळे (सचिव), प्रभाकर धात्रक (खजिनदार), प्रफुल्ल वाघ, अडव्होकेट नाझींम काझी (उपाध्यक्ष), अनिल आठवले (सह सचिव), अडव्होकेट समीर शिंदे, वसंत एकबोटे, प्रमोद अहिरे, शिवदास म्हसदे, अडव्होकेट सोमनाथ मुठाळ, संजय करंजकर विजय राऊत (सदस्य), करुणासागर पगारे, बी.जी.वाघ, रामदास भोंग, बाबुराव दानी, आर. आर. जगताप, अरुण घोडेराव, व्ही.टी.जाधव, अडव्होकेट प्रकाश काळे, प्रा.एस.के.शिंदे, विराज देवांग, प्रल्हाद मिस्त्री, तातेराव जाधव, अडव्होकेट नूतन सोनवणे, राकेश वानखेडे, प्रल्हाद पवार, तल्हा शेख, महादेव खुडे, श्रीकांत सोनवणे तसेच नाशिक मधील नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा