Breaking

तर राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू येऊ देणार नाही - भाजपचे खासदाराचे आव्हान


उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशमधील कैसरगंज येथील भारतीय जनता पक्षाचे (Bhartiya Janta party) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांना अयोध्येत येवू देणार नाही, अशी घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे त्यांनी म्हटले आहे. 


एवढेच नाही तर जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही, असेही खासदार म्हणाले. राज ठाकरे ५ जूनला अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.


भोंग्याच्या वादावर अभिनेता सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...


खा. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी राज ठाकरेंवर सलग ट्विट करून हल्ला केला. ते म्हणाले, “उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येच्या सीमेवर येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी.


तसेच ठाकरे कुटुंबाची भूमिका नाकारत आहे. राम मंदिर आंदोलनाबाबत ते म्हणाले, राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका राहिली आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.


बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध 112 पदांसाठी भरती, 9 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवल्याबद्दल मनसे प्रमुखांनी योगी सरकारचे नुकतेच कौतुक केले असताना भाजप खासदाराने राज ठाकरेंविरोधात आघाडी उघडली आहे. महाराष्ट्रात लाऊडस्पीकर वादाला जन्म देणाऱ्या राज ठाकरे यांच्याशी भाजपची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. मात्र, मनसे आणि राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांबाबतची भूमिका सर्वश्रुत आहे, त्यामुळे त्यांना सोबत घेण्यास भाजप कचरत आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीचा फटका उत्तर भारतात बसू शकतो, अशी भीती भाजपला वाटत आहे. यूपी आणि बिहारचे लोक महाराष्ट्रात जाऊन लोकांच्या नोकऱ्या हिसकावून गुन्हेगारी घटना घडवत असल्याचा आरोप पूर्वी राज ठाकरे करत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा