Breaking


केंद्र सरकार मान्यताप्राप्त कुकुट पालन व शेळी पालन व्यावसायिक प्रशिक्षणाचे पुण्यात आयोजन !पुणे : शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान कात्रज पुणे आयोजित पाच दिवसाचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे .या कार्यक्रमांतर्गत शेळीपालन तसेच कुक्कुटपालन यासारख्या व्यवसायभिमुख व अल्प भांडवलात मुबलक नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांचा अभ्यास केला जाणार आहे.


कृषी व ग्रामीण सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंध मॅनेज हैदराबाद व कृषी मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत संस्थेच्या मार्फत कुक्कुटपालन व शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या आहे . सदर प्रशिक्षणार्थींना या कार्यक्रमा मार्फत कुक्कुटपालन उद्योगाविषयी सखोल माहिती व त्याचे महत्त्व तसेच या व्यवसायातील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी, कोंबड्यांच्या विविध जातींची निवड, त्यांचे व्यवस्थापन व संगोपन, त्यांना होणारे आजार रोगराईचे नियंत्रण तसेच त्यांच्या निवाऱ्याचे प्रकार, संतुलित आहार ,पशुधन घेताना घ्यावयाची काळजी, अंड्या पासून ते कोंबडी च्या प्रत्येक टप्प्यातील निगा आणि व्यवस्थापन ,कुकुटपालन प्रक्रिया, उत्पादन, बाजारपेठ आणि विपणन, गुणवत्ता मापन, पोल्ट्री विमा योजना तसेच प्रकल्प भेटी , प्रकल्पाचा अहवाल तयार करणे आणि अत्याधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने कुक्कुटपालन करणे आदी विषय या अभ्यासक्रमांमध्ये समावेश केला आहे.


सदर कार्यक्रम हा पुणे येथे होणार असून या कार्यक्रमाचे नियोजन अवधूत कदम, अतुल खुडे आणि दत्तात्रय जाधव यांनी केले आहे या कार्यक्रमा बद्दल अधिक सविस्तर माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा .मर्यादित जागा असल्याकारणाने आपला प्रवेश निश्चित करा.


अवधूत कदम 7020241059 

दत्तात्रय जाधव 8668412270

अतुल खुडे 9545672677


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा