Breaking

राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांचा निरिपजी को ऑप क्रेडिट सोसायटी चे वतीने सत्कार


रत्नागिरी : राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे आज रत्नागिरी दौ-यावर आले होते. जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांच्या पदाधिकारी यांना त्यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रत्नागिरी यांचे सभागृहात संपन्न झाला. यावेळी पतसंस्थांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांनी मार्गदर्शन केले.


निरिपजी को ऑप क्रेडिट सोसायटी म.मुंबईच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने आज त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी निरिपजी को ऑप क्रेडिट सोसायटी म.चे अध्यक्ष भूपेशजी मोरे, उपाध्यक्षा मेघना, रत्नागिरी शाखा व्यवस्थापक निलेश नार्वेकर, सहकार तज्ज्ञ सल्लागार शकील गवाणकर यांनी काकासाहेब कोयटे यांचा सत्कार केला.


यावेळी काकासाहेब यांनी आपण फेडरेशनच्या वतीने संपूर्ण सहकार्य करु असे अभिवचन देत निरिपजी को ऑप क्रेडिट सोसायटीला शुभेच्छा दिल्या. यावेळी रत्नागिरी जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष दिपकजी पटवर्धन यांचा ही सत्कार निरिपजी को ऑप क्रेडिट सोसायटी यांचे वतीने करण्यात आला.

यावेळी जिल्हा बॅंक संचालक रमेश कीर,बॅंकेचे कार्यकारी संचालक चव्हाण, फेडरेशनचे संतोष थेराडे आणि जिल्ह्यातील पतसंस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा