Breaking

आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिवांनी दिली भेट


पुणे : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना (tribal research students) फेलोशिप तातडीने सुरू करा (Immediately start fellowships), या प्रमुख मागणीसाठी आदिवासी संशोधक विद्यार्थी 2 हे 2022 पासून दुसऱ्यांदा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI - Tribal Research and Training Institute Pune ) येथे आंदोलनास बसले आहेत. आज (दि.7) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष [CPIM - Communist party Of India (Marxist) ] चे राज्य सचिव ( State secretary) डॉ. उदय नारकर (Dr. Uday Narkar) यांनी भेट घेऊन विद्यार्थ्याचे प्रश्न समजून घेतले.


यावेळी बोलताना डॉ. नारकर म्हणाले, राज्यातील आदिवासी समूहामध्ये उच्च शिक्षणत घेत असलेले आदिवासी सेट नेट पीएचडी धारक संशोधक विद्यार्थी हे आर्थिक हलाखी मध्ये कशाबशा पद्धतीने संशोधनामध्ये काम करत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य शासन किंवा TRTI कडून मिळत नाही, ही खेदाची बाब आहे.


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा प्रश्न धसास लावील, व आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिप मिळेपर्यंत त्यांच्या लढ्यात सोबत राहील, असेही डॉ. नारकर म्हणाले. यावेळी ई फेल विद्यापीठाच्या माजी प्र - कुलगुरू डॉ. माया पंडित याबरोबर आंदोलक विद्यार्थी उपस्थित होते.

राज्य सरकार जाणूनबुजून आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची चाललेली ही परवड कधी थांबणार हा सवाल आता केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा