Breaking

आदिवासी विद्यार्थ्यांची फसवणूक मंत्र्यांनी करू नये; पीएचडी संशोधक अधिछात्रवृत्ती तात्काळ द्या - आमदार विनोद निकोलेमुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांची फसवणूक मंत्र्यांनी करू नये तसेच आदिवासी विद्यार्थ्यांची छळवणूक थांबून आदिवासी (Tribal) पीएच. डी संशोधक अधिछात्रवृत्ती तात्काळ द्या, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (Communist party Of India) डहाणू विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले म्हणाले (MLA Vinod Nikole) यांनी मुख्यमंत्री, वित्त मंत्री सहित आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी (K C Padvi) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, अधिछात्रवृत्ती मिळण्याबाबत ची मागणी घेऊन राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठातील आदिवासी संशोधक विद्यार्थी मागील एका वर्षापासून सतत पाठपुरावा करीत आहेत याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी दि. 28 एप्रिल 2022 पासून 8 दिवस trti या संस्थेच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. दि. 01 एप्रिल रोजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना आश्वासन दिले होते की, तुमचा प्रश्न एका महिन्यात निकाली लावू. मात्र कोणताही सकारात्मक निर्णय न  घेतल्यामुळे आदिवासी संशोधक विद्यार्थी trti कर्यालयासमोर दुसऱ्यांदा बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. 


विद्यार्थ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व मागील आंदोलनामुळे trti संस्थेने पीएच.डी संशोधकांना अधिछात्रवृत्ती चालू करावी यासाठी 85 कोटी 9 लाख 17 हजार रुपयांचा सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र हा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडल्याने आदिवासी विद्यार्थी संशोधनापासून वंचित राहत आहेत. या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी द्यावी अशी जोरदार मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केली असून मुख्यमंत्री सचिवालया कडून संबंधित निवेदन आदिवासी विकास विभागाकडे पाठविण्यात आले आहे असे कळविण्यात आले आहे.

सदरहू निवेदनाची पत्र मुख्यमंत्री, वित्त मंत्री, आदिवासी विकास मंत्री, राज्यमंत्री अपर मुख्य सचिव वित्त विभाग, सचिव आदिवासी विकास विभाग यांच्या कडे देखील पाठविण्यात आले असल्याचे, आ. निकोले म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा