Breaking

'द कश्मीर फाईल्स' चित्रपट पुन्हा वादात, चित्रपटावर घातली बंदीमुंबई : गेल्या दोन महिन्यांपूर्वी विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स'  (The Kashmir Files) चित्रपट प्रदर्शित झाला होता. काश्मिरी पंडितांचे हत्याकांड आणि त्यांच्या पलायनावर आधारित या चित्रपटाने जगभरात 337 कोटींचा गल्ला जमावला. या चित्रपटाला जगभरात भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच सिंगापूर मध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.


अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती यांची भूमिका असलेला 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटात 1990 साली काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय, आपलेच घर सोडून विस्थापन करावे लागण्याची कहाणी दाखवण्यात आली. हा चित्रपट 11 मार्चला भारतात प्रदर्शित झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाची प्रशंसा देखील केली, तर भाजपशासित राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला यावरून राजकीय वातावरणही तापले होते. या चित्रपटावरून सोशल मीडियावर दोन गट पडल्याचे दिसले. अशातच आता चित्रपटात एकतर्फी बाजू दाखवल्याचा आरोप करत ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आल्याचे समोर येत आहे.


सरकारी भरती : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत 76 रिक्त पदांसाठी भरती


काँग्रेस खासदार शशि थरूर यांनी ट्विट सोबत स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले आहे कि, "द काश्मीर फाईल्समध्ये मुस्लिम समाजाविषयी चुकीचे माहिती पोहोचवली जात असून, काश्मीरमध्ये सुरू असलेल्या संघर्षात हिंदूंवर अत्याचार केल्याची एकतर्फी भूमिका यात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटातून दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंगापूरमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या चित्रपटांवर प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जात नाही." असे थरुर यांनी म्हटले आहे.


राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तब्बल 206 पदांसाठी भरती, 16 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


शशी थरूर यांच्या या ट्वीटवर दिग्दर्शित विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी शशी थरूर यांना मूर्ख संबोधले आणि लिहिले प्रिय शशी थरूर, तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, सिंगापूर जगातील सर्वात प्रतिगामी सेन्सॉर आहे. तसेच येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या प्रलोभनांवर (तुमच्या मॅडमला विचारा) बंदी घातली. द लीला हॉटेल फाइल्स या रोमँटिक चित्रपटावरही बंदी घालण्यात आली होती. कृपया काश्मिरी हिंदू नरसंहाराची चेष्टा करणे थांबवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा