Breaking


कोरोना काळात देश एकवटला, आता दुहीचे राजकारण - गुलाम शेख


नाशिक : कोरोना काळात देशभर माणुसकी दिसली. अनेक ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबातील वेक्ती नसल्यामुळे मुस्लीम धर्मियांनी ,विविध संस्था संघटना, नागरिकांनी दुःखाच्या काळात एकमेकांना मदत केली. नाशिक शहरात  मज्जीद मध्ये आम्ही कोरोना उपचार मोफत करून दिले होते. तिथे येऊन 70 टक्केपेक्षा अधिक हिंदू अथवा इतर धर्म च्या नागरिकांना वर उपचार केले. ही भारतीय म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. अनेकांनी कोरोना काळात जीव गमावले आहेत. अनेक कुटुंबातील वेक्ती सोडून गेल्या आहेत. ह्या काळात अनेकांचे आर्थिक कौटुंबिक झाले आहे. हे सावरण्याची सुरुवात होत असतांना मात्र राज्यात व देशात  धार्मिक भावना भडकावून दुही निर्माण केली जात आहे. या विरोधात सर्व देशप्रेमी जनतेने एकत्र येऊन सलोखा प्रस्थापित करण्याचा संकल्प आज जागतिक कामगार व महाराष्ट्र दिनी करूया.


कोरोना काळात अल्प मानधन वर काम करणाऱ्या आशा व गट प्रवर्तक, सफाई कामगार, कंत्राटी कर्मचारी, आरोग्य विभाग कार्यरत कंत्राटी नर्सेस, कर्मचारी, डॉक्टर समाजातील अनेक घटकांनी, कामगार नि जीवावर उधार होऊन कर्तव्य बजावले यांचा सन्मान  होणे गरजेचे आहे. शासनाने कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या सर्वांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आशा कर्मचारी ह्या महत्वाच्या दुवा ठरल्या आहेत त्याचा सन्मान करतांना आनंद होत आहे. देशातील एकता प्रस्थापित राहण्यासाठी काम करण्याचा संकल्प करू या असे आवाहन नाशिक महानगरपालिका चे माजी उपमहापौर गुलाम शेख यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक किसान सभा  वतीने कोरोना योद्धा सन्मान सोहळा प्रसंगी आयटक कामगार केंद्र नाशिक येथे व्यक्त केले.


आयटक कामगार केंद्र नाशिक येथे 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्ताने झेंडावंदन गुलाम शेख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोरोना योद्धा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आयटक चे जिल्हा अद्यक्ष व्ही डी धनवटे, जेष्ठ नेते ऍड दत्ता निकम, एम्स चॅरिटेबल ट्रस्ट चे अजमल खान, वीज कामगार नेते अरुण म्हस्के, ग्रामपंचायत कर्मचारी नेते सखाराम दुर्गुडे, किसान सभेचे नामदेव बोराडे, देविदास भोपळे, दत्तात्रय गायधनी, प्रा. सोमनाथ मुठाळ, प्रभाकर धात्रक, दत्तू तुपे, माया घोलप, विचारमंच वर उपस्थित होते. तर कार्यक्रमचे अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले राज्य सचिव मंडळ सदस्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र होते.

या प्रसंगी प्रमुख अतिथी अजमल खान यांनी कोरोना योध्या आशा च्या कामाचे कौतुक केले. भारतीय संविधान प्रमाणे नागरिकांनी कर्तव्य केले पाहिजे. धर्म ही बाब वेक्तीगत आहे. नाशिक शहरात चर्च मध्ये जाऊन नमाज पडलोत. ही घटना भारतीय नागरिकांना प्रेरणा  देणारी आहे. सामाजिक, धार्मिक ऐक्य निर्माण करण्यासाठी काम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. 

कॉम्रेड दत्ता निकम यांनी कामगार चळवळीचा इतिहास सांगितला. महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी 107  कामगार शहीद झाले होते. याची आठवण ठेवली पाहिजे. व्ही धनवटे यांनी आयटक चे योगदान वर मार्गदर्शन केले. अरुण म्हस्के यांनी कोरोना काळात वीज कामगार पासून सफाई कामगार, बांधकाम कामगार, मोलकरीण, आशा, गट प्रवर्तक, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर सर्वांचे योगदान आहे. सखाराम दुर्गुडे यांनी गावपातळीवर आशा, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक , अंगणवाडी, अंशकालीन स्त्री परिचर आदींनी सेवा केली आहे. त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला पाहिजे असे आवाहन केले. माया घोलप यानी आशा चे प्रश्न मांडले. आयटक च्या माध्यमातून या पुढील काळात तीव्र करण्याचे आवाहन केले. दत्तात्रय गायधनी यांनी औद्योगिक कामगार विरोधात केंद्र सरकारने केलेले कायदे रद्द जालें पाहिजेत यासाठी लढण्याचा संकल्प केला. 

कार्यक्रम चे अध्यक्ष देसले म्हणाले, आज कोरोना योध्या चा सन्मान करतांना आनंद वाटत आहे. गेली दोन वर्षे आपण संघर्ष कोरोना शी करत आहात. देश सेवेचे काम आपण केले. या काळात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आयटक कामगार संघटना आपल्या सोबत होती. आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष- किसान सभा आयटक वतीने आपला सन्मान करून या पुढील काळात आपल्या संघर्ष ला साथ मंचावर उपस्थित सर्व देतील. कोरोना योध्या चे प्रश्न कडे शासन दुर्लक्ष करीत आहेत. याचा निषेध करतो. आशा व गट प्रवर्तक ना केंद्र सरकारने गेल्या 4 वर्षे पासून मोबदल्यात वाढ केलेली नाही. या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. 


प्रचंड महागाई वाढत असल्यामुळे मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. ते सुद्धा वेळेवर मिळत नाही. दुसरीकडे राज्यात व देशात खरे प्रश्न जनतेने विचारू नये यासाठी धार्मिक तेढ निर्माण केले जात आहे. जनतेने हा कावा ओळखून धार्मिक सलोखा अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. देशात कोरोना मुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. देशाची अपरिमित हानी झाली आहे. देशाचे ऐक्य अबाधीत राहण्यासाठी भारतीय संविधान समजून घेऊन प्रत्येकाने कर्तव्य बजावले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करु या. कामगार ना 8 तास च काम करण्यासाठी चळवळ झाली. अनेकांनी बलिदान दिले. मात्र आज पुन्हा आशा ना 24 तास कामाची अपेक्षा केली जाते. मात्र त्यांना कर्मचारी म्हंटले जात नाही. याचा राग येतो. यापुढील काळात योजना कर्मचारी, कामगार एकजूट मजबूत करून लढावे लागेल. देशातील शेतकरी केंद्र सरकार विरोधात 13 महिने लढून विजय  मिळवला. व शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले. तसा च लढा कामगार विरोधी कायद्यासाठी व योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या यासाठी करावा लागेल. या करिता संघटना आप आपल्या मजबूत केल्या पाहिजेत.  महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी लढणाऱ्या सर्वाना अभिवादन अभिवादन करून त्याच्या स्वप्नातील समाजवादी महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार जाधव यांनी केले. सूत्रसंचालन भीमा पाटील आयटक संघटक यांनी केले. आभार दत्तू तुपे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवृत्ती कसबे, स्वामिनी बॅंडकुळे, गायत्री बुचकूल, राकेश वालजाडे, छाया वराडे आदींनि परिश्रम घेतले. कोरोना योध्या आशा, गट प्रवर्तक, सफाई कामगार आदींचा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 


या प्रसंगी अनिता काळे, लक्ष्मी पगारे, पूजा ढाले, संगीता शिंदे, मनिर अन्सारी, सविता साळवे, प्रमोद केदारे, अड.नूतन सोनवणे, तात्याराव जाधवर, राजेंद्र जाधव, महेश चौधरी, राजेंद्र सावंदे, छाया वराडे, जाधव, स्वाती ताटे, जोती ब्राह्मणे, सुवर्णा संचेती, विजया म्हसकर, गंगा कर्पे, कांचन पवार, माया खैरे, भिका मांडे आदी आशा व कोरोना योध्ये उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा