Breaking

व्याजदरात वाढीमुळे "महागाईचा भोंगा" पुन्हा वाजला - काशिनाथ नखाते

 

घर घेणे अवघड, जनतेची क्रयशक्ती कमी होईल - काशिनाथ नखाते


पिंपरी चिंचवड :  इंधन, गॅस, किराणा, भाजीपाला यांचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत. दरवाढीने सर्वसामान्य त्रासला असताना आता रिझर्व्ह बँकेनेही  रेपो दरात तब्बल ०.४० टक्के वाढ करण्याची घोषणा बुधवारी केली. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहनकर्ज महागणार आहे.


सामान्य उत्पन्न धारक आणि मध्यम वर्गाच्या घरांच्या स्वप्नाचा चुराडा होणार आहे. तीन वर्षांनी प्रथमच रेपो दरात झालेल्या व्याज दरवाढीने केंद्र सरकारने प्रचंड महागाई वाढवली आहे हे सिद्ध होत आहे तशी पुष्टि गव्हर्नर शशिकांत दास यानीं दिली आहे. त्यामुळे विद्यमान कर्जदारांच्या ईएमआयमध्ये ६००रु. ते १२०० रु. मासिक व्याजदर वाढ होणार आहे, असे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कष्टकरी संघर्ष महासंघाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील सरकारी योजना आणि खाजगी बांधकामातील प्रकल्पात घरे घेणाऱ्या लोकांना ही व्याजदरवाढ परवडणारी नाही, शहरातील बहुसंख्य नागरिक डाउन पेमेंट देऊन दुचाकी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, कॉम्प्युटर इ गरजेच्या वस्तू हप्त्यावर घेतात. या व्यवसायावर परिणाम होणार आहे. व्याजदरवाढीचा थेट संबंध घरे, वाहन, वैयक्तिक व औद्योगिक यांना दिले जाणारे कर्ज याच्याशी असल्याने हप्ता वाढणार आहे, असे काशिनाथ नखाते यांनी नमुद केले आहे.


- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा