Breaking

भीषण अपघात : कार आणि गॅस टँकरची धडक 3 ठार


खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर  भीषण अपघात झाला आहे. बोरघाटामध्ये गॅस टँकर पलटी होऊन अपघात झाला आहे. पुण्यावरुन मुंबईच्या दिशेने येत असलेल्या गॅस टँकरची नियंत्रण सुटल्यामुळे कारला धडक होऊन तीन जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.


सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. सध्या टँकर उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खबरदारी म्हणून खोपोली अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. या अपघातात गॅस टँकरचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुणे येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

महामार्गावरील दोन कार या क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आल्या आहेत. खोपोली अग्निशमन विभागाच्या मदतीने टँकर महामार्गावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा