Breaking


संयुक्त अरब अमीरातचे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन ; ४ दिवसांचा दुखवटा जाहीर!

 

संयुक्त अरब अमीरातचे (UAE) राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान (Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan) यांचे निधन झाले आहे. यूएईमधील सरकारी वृत्तसंस्था WAM ने याला दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान 73 वर्षांचे होते आणि ते अनेक दिवसांपासून आजारी होते. राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनानंतर सरकारने 4 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. याशिवाय, देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवस सुट्टी असेल. दुबई मीडिया ऑफिसद्वारे राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्याची माहिती देण्यात आली आहे.  


बावी गावचे सुपुत्र राजकुमार सत्यवान मोरे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त !


गेल्या काही वर्षांपासून शेख खलिफा यांचा सरकारी कार्यक्रमात किंवा इतर ठिकाणी वावर हा खूपच दुर्मिळ झाला होता. त्यांचे यासंबंधी फोटोही प्रसिद्ध करण्यात आले नाहीत. 2004 साली शेख खलिफा यांचे वडील आणि यूएईचे संस्थापक शेख झाएद यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर यूएईच्या अध्यक्षपदी शेख खलिफा यांची निवड झाली होती. काही वर्षांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा गंभीर आजार जडला आणि ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले. शेख खलिफा हे यूएईचे दुसरे अध्यक्ष आणि अबुधाबीचे 16 वे शासक होते. ते शेख झाएद यांचे सर्वात मोठे अपत्य होते.

जागतिक उष्णता वाढ हे शतकातील पृथ्वी पुढील मोठे संकट " - ॲड. गिरीश राऊत


जगातला सर्वात उंच टॉवर असलेल्या दुबईतील बूर्ज खलिफाचे नाव हे शेख खलिफा यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा