Breaking

... म्हणून मनसे नेते वसंत मोरे भोंग्यांच्या आंदोलनात सहभागी झाले नाही


पुणे : मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्यानंतर राज ठाकरेंच्या या भुमिकेवर मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे नाराज झाले होते, त्यानंतर वसंत मोरेंना मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून हटविण्यात आले. राज्यात भोंग्यावरून मनसे आक्रमक झाली असताना कुठल्याच आंदोलनात वसंत मोरे दिसले नाही, त्यामुळे चर्चेला उधान आले असताना मोरे यांनी आपण बालाजीला असल्याचा खूलासा त्यांनी केला आहे.


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर मनसे कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी मशिदींसमोर हनुमान चालीसाचं पठण केलं, तर काही ठिकाणी स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. या आंदोलन काळात पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगत असताना अखेर वसंत मोरेंनी फेसबूक पोस्ट करुन आपण कुठे होतो याचा खुलासा केला आहे.


भोंग्याच्या वादावर अभिनेता सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखती द्वारे होणार निवड !


आपल्या फेसबूक पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणाले आहेत कि, पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय, साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले. म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार...! असे ते म्हणाले आहेत.


 बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध 112 पदांसाठी भरती, 9 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती, 8 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा