Breaking

व्हिडिओ : चिखली पेठ क्र.१६ येथे अखंड हरीनाम सप्ताह आणि गाथा भजन


पिंपरी चिंचवड : चिखली प्राधिकरण सेक्टर १६ येथील विठ्ठल रुख्मिणी ट्रस्ट, लोकमान्य प्रतिष्ठाण, राजेशिवजीनगर, जाधववाडी, चिखली पेठ क्र.१६ येथे गुरुवार दि.६ मे २०२२ ते १३ मे २०२२ पर्यंत अखंड हरीनाम सप्ताह, गाथा भजन पारायण आयोजित करण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर, नगरसेवक, राहुल जाधव यांनी या सप्ताहाचे आयोजन केले आहे.


यावेळी माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, उद्योगनगरीला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. दरवर्षी विठ्ठल रुख्मिणी मंदिरात येथील नागरिकांच्या सहकार्याने अखंड हरीनाम सप्ताह आयोजित करत असतो. मात्र कोरोना महामारीमुळे खंड पडला होता.


यावर्षी एकूण दररोज सायंकाळी सात प्रवचने आयोजित केली आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. समतेचा, समानतेचा वारकरी संप्रदायाचा विचार या प्रवचनातून प्रसारित करत आहोत.

मंगलाताई जाधव म्हणाल्या, "आध्यात्म, समाजप्रबोधन आणि स्त्री शक्तीचा जागर या सप्ताहातून करण्यात येत आहे. परिसरातील महिला वर्ग येथे आवर्जून गाथा भजनात हाती टाळ घेऊन ब्रम्हानंद घेत आहे."

- क्रांतीकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा