Breaking


व्हिडिओ : सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यासाठी इफ्तार पार्टी


पिंपरी चिंचवड : ज्याचे ओठ तहानेने सुकलेले असतात. जे जे कोणी भुकेने व्याकुळ असतात. त्यांना तृप्त करून एक सामाजिक बांधिलकीची जाणीव जागृत प्रसारित करण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते, असे डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (Democratic Youth Federation Of India) चे सचिव अमिन शेख यांनी सांगितले.


डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) पिंपरी चिंचवड शहर शाखेने दत्तवाडी आकुर्डी येथे सर्व धर्मीय युवकांना एकत्र करून रोजाची सांगता केली. यावेळी उपस्थित युवकांना फळे आणि गोड भोजन देण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन अमिन शेख, शिवराज अवलोळ, गौरव पानवलकर, मनोज शिंदे, इर्शाद शेख, प्रसाद जगताप, अनिकेत मोरे, आफ्रिन शेख, नासिर शेख, गुलनाज शेख, आदर्श पांडे, श्रीकांत सुतार, नितेश चावरीया यांनी केले.

- क्रांतिकुमार कडुलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा