Breaking

व्हिडिओ : श्रीलंकेत प्रचंड हिंसाचार, 9 बळी तर 200 जखमी


त्रिकोमली : वाढती महागाईने त्रस्त जनतेच्या उग्र आणि हिंसक आंदोलनामुळे श्रीलंकेत अराजकता निर्माण झाली आहे. प्रचंड महागाईमुळे श्रीलंकेचे सरकार कोसळले असून सोमवार पासून राजधानी कोलंबोसह देशाच्या विविध शहरात हिंसाचार सुरू आहे.


माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबाने पूर्व श्रीलंकेतील त्रिंकोमाली नौदल तळावर आश्रय घेतला आहे. त्यांना हेलिकॉप्टरने तळावर नेण्यात आले असून तेथेही आंदोलकांनी गर्दी केली आहे. 


तर श्रीलंकेचे खासदार जनक बंदारा तेनाकून यांच्या दांबुला येथील घराला आंदोलकानी आग लावली आहे. श्रीलंकेत आतापर्यंत 9 जणांना हिंसाचारात आपला जीव गमावला आहे. तर 200 हून जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तू, औषधे, इंधन ई दैनंदिन वस्तूंचा तुटवडा आहे. परदेशी चलन संपल्यामुळे आयात व्यापार थंडावला आहे. महागाईचा दर 30 टक्के झाल्यामुळे जनता चलन संकटाला तोंड देत आहे. लोक संतप्त होऊन लोकप्रतिनिधींची घरे जाळत आहेत.


भारत सरकारने आतापर्यंत 3.5 अब्ज डॉलर्सची मदत केली आहे. श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक +94-773727832 आणि ईमेल आयडी cons.colombo@mea.gov.in जारी करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा