Breaking

व्हाट्सअपने एका महिन्यात 18.05 लाख भारतीयांचे अकाऊंट केले बंद, वाचा कारण !


नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप (Whatsapp) ने नवीन आयटी नियमांचे पालन करून मासिक अहवाल जारी केला. ज्यात 18.05 लाख खाती (Account) बंद (Banned) केल्याचे म्हटले आहे. व्हॉट्सअॅपने मासिक अहवालात ही माहिती सार्वजनिक केली आहे. 1 मार्च, 2022-31 मार्च 2022 दरम्यान WhatsApp द्वारे ही खाती बंद करण्यात आली आहेत.


भारतातील 50 लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर भारताच्या नवीन IT कायद्यानुसार तक्रारी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल प्रकाशित करणे बंधनकारक आहे. व्हॉट्सअॅपने सांगितले की, 18.05 लाख ब्लॉक केले गेले आहेत कारण ते त्याच्या गैरवापर शोधण्याच्या पद्धतीचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे.


भारतातील कायद्यांचे किंवा WhatsApp च्या सेवा अटींचे उल्लंघन केल्याबद्दल प्रतिबंध आणि शोध पद्धतींद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे.

WhatsApp ने माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021 (IT नियम, 2021)- च्या नियम 4(1)(d) चे पालन करून अहवाल प्रकाशित केला आहे. भारतातील नवीन IT नियम जे गेल्या वर्षी लागू झाले. त्यानुसार 50 लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मने प्रत्येक महिन्याला प्राप्त झालेल्या तक्रारी आणि केलेल्या कारवाईचा तपशील नमूद करून अनुपालन अहवाल प्रकाशित करणे बंधनकारक आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा