Breaking

काश्मीर मध्ये हिंदूंवर हल्ले झाले त्यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजप पुरस्कृत सरकारे होती - शरद पवार


भोसरी येथील जश्न ईद-ए-मिलन कार्यक्रमात भाजपचा खरपूस समाचार


पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर समिती कडून भोसरीमध्ये राष्ट्रीय एकात्मता मेळावा,तसंच जश्न ईद-ए-मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवारही सहभागी झाले. 

यावेळी हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध धर्मातील प्रमुख धर्मगुरुंच्या उपस्थितीतीत यावेळी बोलताना पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवडला मिनी इंडिया म्हणतात. त्याचं प्रदर्शन आमच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. प्रत्येक धर्म कुणाचा द्वेष करा असं सांगत नाही, तर बंधुभाव जोपासा असं सांगतो. हाच संदेश देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं हा सोहळा आयोजित केल्याचं पवार म्हणाले.


पवारांची भाजपवरही टीका

छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की सामान्य लोकांचं राज्य आलं पाहिजे. देशात हिंदू मुस्लिम दुही निर्माण केली जात आहे. काश्मीर फाईल हा चित्रपट त्याचाच भाग आहे. काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. मात्र शेजारच्या देशाला ते मान्य नाही. अतिरेकी शक्तींना बळ देऊन हिंदू-मुस्लीम ऐक्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न सातत्याने या देशाकडून केला जातो. असे हल्ले झाल्यानंतर दुर्दैवाने तेथील जनतेकडून वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न होतो. 

काश्मीरमध्ये हिंदूंवर हल्ले झाले होते, तेव्हा केंद्रात व राज्यात भाजपच्या मदतीचे राज्य होते. मात्र, तरीही तोच विचार आता लोकांमध्ये संघर्षांचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न 'काश्मीर फाईल्स' मधून करतो, हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे.


काश्मीर हा देशाचा अविभाग्य भाग आहे. तिथं अतिरेकी हिंदू, मुस्लिमांवर हल्ले करतात. ज्या ज्या वेळी ते घडलं त्यावेळी सत्तेत भाजप होती आणि आता तेच विरोधी वातावरण तयार करत आहेत, हे निंदनीय आहे, अशा शब्दात पवारांनी भाजपवर टीका केलीय.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित गव्हाणे यांनी केले. विनायक रणसुभे, दीपक साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. युसूफ कुरेशी यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा