![]() |
आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथील श्री राम मंदिर ट्रस्ट, आवेकर भावे रामचंद्र संस्थानच्या विश्वस्तपदी अर्जुन मेदनकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माहेश्वरी जनकल्याण ट्रस्ट तसेच विविध सेवाभावी संस्था, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या गौरवप्रसंगी ह.भ.प. तुकाराम महाराज ताजणे, शिवसेना उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, शाखा प्रमुख रोहिदास कदम, विभाग प्रमुख शशिकांत राजे जाधव, मयुरेश्वर प्रतिष्ठान अध्यक्ष मयूर पेठकर, गोविंद ठाकूर तौर, जयसिंग कदम, सुहास सावंत, उद्योजक बालाजी शिंदे व इतर मराठा सेवक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार समारंभात सामाजिक कार्यकर्ते शशिकांत राजे जाधव व जयसिंग कदम यांच्या हस्ते अर्जुन मेदनकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना तुकाराम महाराज ताजणे म्हणाले, “जे लोक समाजाचं ऋण फेडण्याचं काम करतात, निरपेक्ष वृत्तीने समाजासाठी कार्य करतात, त्यांचाच सत्कार होतो. अर्जुन मेदनकर यांचं कार्य सामाजिक बांधिलकीचं द्योतक आहे. त्यांच्या हातून नेहमीच सत्कर्म घडत असून, कोणतेही कार्य त्यांच्या पर्यंत गेलं, तर ते पूर्णत्वास जाते, हा अनुभव समाजाला आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या निवडीचे आळंदी पंचक्रोशीतील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून, अर्जुन मेदनकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार म्हणजे एक आदर्श ठरणारा उपक्रम ठरला आहे.