पिंपरी चिंचवड - सेवासदन दिलासा केंद्रात मध्ये शुक्रवार दि. १७/७/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता प्रथम सत्राची पालक सभा आयोजित करण्यात आली होती. पालक सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक श्रीमती प्रवदा नायर (समुपदेशक ) नई दिशा यांनी "सशक्त पालकत्व तणाव आणि येणाऱ्या आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करणे" . या विषयावर अतिशय मार्मिक पद्धतीने उदाहरणासह मार्गदर्शन केले नई दिशाचे सोशल वर्कर शुभम साठे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये हरिदास शिंदे समुपदेशक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे व रमेश मुसूडगे (डायरेक्टर. विशेष शिक्षक व समुपदेशक ) अभिराज फौंडेशन यांनी दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढील कार्यशाळेची माहिती व पालकांच्या समस्या सोडवण्याबाबत मार्गदर्शन करण्यास संमती दर्शवली दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विकास पवळे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती हर्षदा वाळके यांनी केले. व आभार श्री महेश जमदाडे यांनी केले .
दुपार सत्रातील कार्यक्रम
दुपारचे सत्र ठीक २:००वाजता सुरू झाले . प्रमुख. मार्गदर्शन मा.डॉक्टर विना दुबे यांनी विद्यार्थ्यांचा आहारा कसा असावा व इतर समस्या विषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीमती खिलारी यांनी केले.
या पालक सभेसाठी सकाळच्या सत्रात व दुपारच्या सत्रात दोन्ही सत्रामध्ये पालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. आभार श्रीमती प्रज्ञा खिलारी यांनी केले.