पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : महात्मा फुले नगर येथील ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघात ऑगस्ट महिन्यातील सन्मानीय सभासदांचा एकत्रित वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात कमलाकर टिळेकर, शशिकला देशमुख, मेघा उमककार, सुलोचना वदक, सुलोचना बाराहाते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अभिष्टचिंतन सोहळ्यात यशवंत कन्हेरे, शिवानंद चौगुले, विश्वास सोहनी, सुनंदाताई मुंडे आदी मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त करून मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची लाभली.
कार्यक्रमाची सांगता भोजनोत्तर सहभोजनाने झाली. या वेळी संघाचे अध्यक्ष, सचिव व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.