बाबा महाकाल भस्म आरती अमित कुऱ्हाडे यांचा लक्षवेधी देखावा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अमित जयसिंग कुऱ्हाडे पाटील यांनी आपल्या घरातील लक्षवेधी देखाव्यांची परंपरा यावर्षी हि कायम ठेवत या वर्षी गणेशोत्सवात बाबा महाकाल भस्म आरती देखावा सादर करून आळंदीकरांची दाद मिळवली आहे.
आळंदीत पौराणिक, धार्मिक, सामाजिक जनजागृती करणारे देखावे लक्षवेधी रित्या साकारण्यात आले आहेत. उज्जैन महाकालेश्वर ज्योतिर्लिंग भस्म आरती देखावा पाहण्यास मोठी गर्दी होत आहे. मंदिरातील आरतीचा भास होत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आळंदी शहराध्यक्ष विलास कुऱ्हाडे, गणेश कुऱ्हाडे, अमित कुऱ्हाडे, अक्षय कुऱ्हाडे यांनी परीश्रम घेतले. महाकाल मंदिर सजले आहे. नंददीप आणि आरती लक्षवेधी ठरत आहे. यास संगीतसाथ हि खूपच लक्षवेधी झाली आहे.
आळंदीत विविध आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई देखावे सादर करण्यात आले आहेत. आळंदीत ढोल ताश्यांच्या गजरात,फटाक्यांच्या अतिषबाजीत विसर्जन मिरवणुका सुरु झाल्या असून मंगलमय वातावरणात जयघोष केला जात आहे. येथील जय गणेश प्रतिष्ठाणने कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराची प्रतिकृती देखावा, जय गणेश ग्रुप मंडळाने उज्जैन महाकालेश्वर मंदिर प्रतिकृती, एकलव्य मित्र मंडळाने विद्युत रोषणाई सुवर्ण मंदिर, राजे ग्रुप यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन चरित्रावर आधारित ताटी उघडा ज्ञानेश्वरा देखावा सादर करीत भाविकांची दाद मिळवली आहे.
कुऱ्हाडे आळीतील न्यू अमरज्योत मित्र मंडळाने बालाजी मंदिर प्रतिकृती सह बालाजी गणेश मूर्ती, श्री दत्तनगर प्रतिष्ठाणने विद्युत रोषणाई मंदिरास केली आहे. न्यु दत्तनगर ग्रुप यांनी पॅलेस, विद्युत रोषणाई, शिवस्मृती प्रतिष्ठान परंपरेने १५ फुटी लालबाग राजाची मुर्ती, अमरदिप मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई, धर्मराज गणपती मंडळाने पॅलेस, आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. स्व. बाबाशेठ मुंगसे पाटील प्रतिष्ठाणने ओपन मंडप आणि सजावट, रोषणाई, सद्भावना ग्रुप मंडप सजावट, नवशिवशक्ती तरुण मंडळ हरिकीर्तन, भजनसेवा, विद्युत रोषणाई, शिवतेज मित्र मंडळ धार्मिक परंपरेने आरती, सत्कार समारंभ, व्यापारी तरुण मंडळ, राजे शिवछत्रपती मंडळ साधे पद्धतीने उत्सव साजरा करीत आहे. माऊलीं पार्क बाल मित्र मंडळ केदारनाथ डोंगर देखावा, रोषणाई सह शहरात धार्मिक, सामाजिक कार्याची पर्वणी तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
शहरातील देखावे पाहण्यासाठी हळूहळू गर्दी होत आहे. येथील हनुमान तरुण मंडळाने मंडळांचे पदाधिकारी, सदस्य नातेवाईक यांचे घरातील मान्यवरांचे निधन झाल्याने यावर्षी सामाजिक बांधिलकीतून श्रद्धांजली अर्पण करीत शांततेत साद्या पद्धतीने उत्सव साजरा केला आहे. आळंदीसह परिसरातील गणेश मंडळांनी विविध उपक्रमाने आयोजन केले आहे.
अहिल्यानगर ( नगर दक्षिण ) मतदार संघाचे लोकप्रियं खासदार निलेश लंके यांनी कोरेगांव भिमाचा राजा गणपती - कोरेगांव भिमा, पुणे येथे भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यवेळी निखिल बाळासाहेब भालेराव यांनी मंडळाचे वतीने स्वागत केले. आमदार बाबाजी काळे यांनी आळंदी, चाकण, खेड येथील गणेश उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना भेटी देत संवाद साधला. यावेळी आरती, पूजा करीत गणेशोत्सवात संवाद साधत मंडळांना भेटी दिल्या. गणेश भक्त, नागरिक आणि पदाधिकारी यांनी स्वागत करीत संवाद साधला आहे.