पिंपरी चिंचवड - गणेश भक्तांनी गणरायाची ११ दिवस मनोभावे पूजाअर्चा व सेवा केली व आज गणपती बाप्पा मोरया च्या गजरामध्ये विसर्जन मिरवणुका निघाल्या. दापोडी गावातील" अष्टविनायक सांस्कृतिक व क्रीडा मंडळ दरवर्षीप्रमाणे आपल्या सामाजिक, धार्मिक व पर्यावरण पूर्वक अशा देखाव्यासाठी गणेश भक्तांना परिचित असून आज मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी आळंदीतील लहान वारकऱ्यांच्या' ज्ञानोबा माऊलीच्या जय घोष करून टाळ मृदुंगाच्या गजरात विसर्जन मिरवणुकीस सुरुवात केली.
यावेळी भजनाच्या गजरात महिलांनी पारंपारिक वेश परिधान करून फुगड्या खेळल्या यानंतर घाटावरती श्री ची आरती होऊन त्याला आवडणाऱ्या मोदकाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले " गणपती निघाले गावाला "--चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया" या गजरात गणपतीचे विसर्जन करण्यात आले.