पिरंगुट (ता. मुळशी) :ज्ञानध्येय फौंडेशन आणि एशियन मशीन टूल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मविभूषण रतन टाटा (1937–2024) यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शेरे गावातील आदिवासी बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने अन्नधान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
या प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल नरूटे म्हणाले कि, “आम्ही २०१२ पासून दरवर्षी आमचा वर्धापन दिन समाजोपयोगी कार्य करत साजरा करत आलो आहोत. यंदापासून रतन टाटा यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी ९ ऑक्टोबरला सामाजिक कार्य करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.”
या उपक्रमासाठी कंपनीचे सहकारी संचालक हेमंत सोनार, सुनील कबाडे, जगदीश शेळके, शंकर पांढरे, दीपक मंथन, शुभम गायके ,रूपेश साठे, अनिकेत आहेर, राकेश गावडे आणि माधवी मोदी उपस्थित होते.
तसेच शेरे गावाचे मनोज ढमाले , रूपेश जाधव आणि माऊली गोळे आदी उपस्थित होते.
त्यांनी त्या ठिकाणी एशियन मशीन टूल कॉर्पोरेशन प्रा. लि. चे आभार मानले.
मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “एशियन मशीन टूल कंपनी मार्किंग व ट्रेसिबिलिटी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून, आपला उद्योग वाढवताना सामाजिक बांधिलकीही जपत आहे.”
या वेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल नरूटे , संचालक श हेमंत सोनार आणि मुख्य लेखाधिकारी जगदीश शेळके यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या अन्नधान्य वितरण उपक्रमामुळे स्थानिक आदिवासी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.