PCMC- लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर अ‍ॅक्टिव्ह क्लबला झोन चेअरपर्सन MJF लायन उज्ज्वला कुलकर्णी मॅडम यांची अधिकृत भेट


पिंपरी चिंचवड - लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर अ‍ॅक्टिव्ह क्लबला झोन चेअरपर्सन MJF लायन उज्ज्वला कुलकर्णी मॅडम यांची अधिकृत भेट पार पडली.

या भेटीत मॅडमनी क्लबच्या आगामी उपक्रमांसाठी मार्गदर्शन केले तसेच क्लब प्रशासनाबाबत मोलाचे सल्ले दिले. समाजकार्यासाठी अधिक जोमाने आणि उत्साहाने कार्य करण्याच्या शुभेच्छा त्यांनी क्लबला दिल्या.

क्लबचे अध्यक्ष लायन बालाजी जगताप यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “ही आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी आणि आनंददायी अनुभूती होती. झोन चेअरपर्सन मॅडमच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला नवीन दिशा आणि विचारांची प्रेरणा मिळाली.”

कार्यक्रमात अध्यक्ष लायन बालाजी जगताप यांनी क्लबच्या मागील कालावधीतील कार्याचा आणि प्रशासनाचा सविस्तर अहवाल सादर केला. सचिव लायन डॉ. ज्योती क्षीरसागर यांनी सेक्रेटरील रिपोर्ट सादर केला, तर खजिनदार लायन जितेंद्र हिंगणे यांनी क्लबचा आर्थिक अहवाल मांडला.

यावेळी ऑक्टोबर सर्व्हिस वीक चेअरपर्सन यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. क्लबचे सर्व माननीय सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.




अध्यक्ष लायन बालाजी जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आपल्या प्रेरणादायी शब्दांनी आमच्या टीममध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आम्ही समाजसेवेच्या कार्यात अधिक जोमाने, निष्ठेने आणि उत्साहाने कार्य करत राहू. भविष्यात आमचा क्लब ट्रस्ट फॉर्मेशन करून कायमस्वरूपी समाजोपयोगी प्रकल्प उभारणार आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी क्लबच्या वतीने झोन चेअरपर्सन MJF लायन उज्ज्वला कुलकर्णी मॅडम यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे व प्रेरणेमुळे क्लब अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम राबवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ZC visit चेअरपर्सन Ln योगेश नाईक यांनी आभार मानले.

— टीम PST

लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर अ‍ॅक्टिव्ह 




थोडे नवीन जरा जुने