पुण्यातील सामाजिक संस्थांचे मराठवाड्यातील पुरग्रस्तांसाठी सरसावले शैक्षणिक मदतीचे हात

 


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - पुण्यातील सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ,आधार शैक्षणिक संस्था,श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था, एक्सलंट इंटरनॅशनल स्कूल मोशी, अथर्व वॉटर टेक् सोल्युशन्स आणि अमुकेट प्रॉडक्ट्स अँड टेक् सोल्युशन्स प्रा ली च्या टीमने दिनांक ४ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हयातील अति पूरग्रस्त भाग म्हणजेच सांगवी (पाटण) आणि धनगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी, सुदर्शन विद्यालय पाटण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी येथे २८० शालेय साहित्य किट चे वाटप करण्यात आले.

सदर प्रसंगी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व अमित कोकणे, पुणे शहर जनरल सेक्रेटरी रविंद्र आळणे , सदस्य अमोल भोसले, सुरेंद्र नाथ, सागर तावरी, क्षमा काळे आणि रीना शिंदे  उपस्थित होत्या.

आपण अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान तर भरू शकत नाही, परंतु त्यांच्या मुलांची हरवलेली स्वप्ने आपण जिवंत ठेवण्याचे काम या उपक्रमातून करण्याचा प्रयत्न करत आहोत. शिक्षण हा भविष्यासाठीचा प्रकाश आहे, त्यातूनच आपल्या देशाचा सुशिक्षित नागरिक घडवूया..! शिक्षणाला बळ देऊया..! असे वक्तव्य पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात केले.

आपणही शेतकऱ्याची पोरं आहोत, शेतकऱ्याचं दुःख आपण अंतर्बाह्य जाणू शकतो. एका कुटुंबांवर जेव्हा कुठलीही आपत्ती ओढवते, प्रतिकुल परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी त्या कुटुंबाला खरी आधाराची गरज असते. परंतु दुर्दैव हे आहे की अशा वेळी सल्ले देणारे खुप भेटतात असे वक्तव्य अथर्व वॉटर टेक सोल्युशन्स चे डायरेक्टर व सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे शहर जनरल सेक्रेटरी रवींद्र आळणे यांनी दैनिक युवक आधार वृत्तपत्र शी बोलताने केले.




आपण सर्वांनी एकत्र येऊन नेहमीच समाजातील गरजु घटकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत, आजच्या  आपल्या *एक हात मदतीचा..!*शैक्षणिक उपक्रम..!!* या उपक्रमांतर्गत आपण शेतकऱ्याच ऋण फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत असे वक्तव्य सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष व अमुकेट प्रॉडक्ट्स अँड टेक सोल्युशन्स प्रा ली चे डायरेक्टर अमित कोकणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

 या मदतीसाठी *सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष, आधार शैक्षणिक संस्था पुणे चे सचिव व श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था पुणे चे संस्थापक अध्यक्ष किशोर आण्णासाहेब थोरात, एक्सलंट इंटरनॅशनल स्कूल मोशी चे प्रतिनिधी, अथर्व वॉटर टेक् सोल्युशन्स चे डायरेक्टर रवींद्र आळणे,अमुकेट प्रॉडक्ट्स अँड टेक् सोल्युशन चे डायरेक्टर अमित कोकणे आणि इतर सदस्यांनी ही मदत योग्य ठिकाणी पोहोचविण्यात मोलाची मदत केली तर सफर शैक्षणिक किट बनविण्यासाठी एक्सलंट इंटरनॅशनल स्कूल जाधववाडी च्या प्राचार्य सविता थोरात व संपूर्ण शिक्षक स्टाफ यांनी मदत केली,एक्सलंट इंटरनॅशनल स्कूल मोशी येथील शिक्षक स्टाफ ने मदत केली तर त्यांचे पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातून कौतून करण्यात येत आहे.


 सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी(पाटण) चे मुख्याध्यापक चांगदेव तरटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी चे मुख्याध्यापक विशिष्ट तरटे आणि सुदर्शन माध्यमिक विद्यालय पाटण चे प्राचार्य साईनाथ बोडके व गावातील सरपंच, शाळेतील इतर स्टाफ आणि गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक संस्थांनी वेळेत केलेल्या मदतीचे कार्य आम्ही विसरणार नाही व आम्ही सदैव ऋणी असू असे सांगून सर्व मुख्याध्यापकांनी सामाजिक संस्थांचे आभार मानले.

सदर प्रसंगी दैनिक वास्तव वृत्तपत्राचे पत्रकार समीर शेख व दैनिक युवक आधार चे पत्रकार मारुती सत्रे उपस्थित होते व त्यांनीही ग्रामीण भागासाठी दाखवलेल्या आत्मियतेचे भरभरून कौतुक केले.

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ असे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते तर हा उपक्रम राबवून यशस्वी केल्याबद्दल सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष टेजसजी परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी फोन वरून संपूर्ण पुणे टीम चे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने