पिंपरी चिंचवड - तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय, नवी सांगवी यांच्या वतीने रामजी आंबेडकर व वीर लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
साई चौक येथे झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, निवृत्त उपप्राचार्य रवींद्र इंगोले, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, डॉ. बबन जोगदंड, प्रेरणा सहकारी बँकेचे संस्थापक कांतीलाल गुजर, सांगवी विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश भागवत, सुखदेव चोरमले, कृष्णा शिंदे, संपत बनसोडे, सुरेश सकट, निखिल चव्हाण, शंकर गणगे, चंद्रकांत कांबळे, दिलीप शेलार आदी उपस्थित होते.
भारतीय राज्यघटना देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. डॉ. जोगदंड म्हणाले, की भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला घडविण्यात पिता म्हणून सुभेदार रामजी आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे. प्रास्ताविक नारायण भागवत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुलाम गायकवाड, सुरेंद्र जाधव, राहुल काकडे, शिवाजी चव्हाण, राजू कोंडके, भाऊ शिंदे, भालचंद्र नाईक, यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दिलीप कांबळे यांनी, तर आभार मगन सावंत यांनी मानले.
