!-- afp header code starts here --> आळंदीत संविधान दिनी संविधान उद्देशिकेचे लोकार्पण

आळंदीत संविधान दिनी संविधान उद्देशिकेचे लोकार्पण

 


संविधान उद्देशिकेचे वारकरी, भाविक, नागरिकांना वाटप

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी जनहित फॉउंडेशन, भारतीय बौद्ध महासभा, स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, संदेश नवले सोशल फाउंडेशन, आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने आळंदी पंचक्रोशीतील संविधान प्रेमी नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिना निमित्त संविधान उद्देशिका कोनशिला पूजन, लोकार्पण, संविधान उद्देशिकेचे वारकरी, भाविक, नागरिकांना वाटप, उद्देशिकेचे वाचन आणि मान्यवरांची मनोगते अशा विविध उपक्रमांनी संविधान दिनी जनजागृती करत संविधान दिन साजरा करण्यात आला.  

यावेळी संत साहित्याचे अभ्यासक विश्वकर्मा महाराज पांचाळ, जेष्ठ कीर्तनकार तुकाराम महाराज ताजणे, मुख्य संयोजक आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सचिव रामदास दाभाडे, कैवल्य टोपे, विश्वभर शिंदे, पत्रकार गौतम पाटोळे यांच्या सह विविध संघटनेचे पदाधिकारी, नागरिक, भाविक  उपस्थित होते.

  यावेळी उपस्थित मान्यवरांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करीत उद्देशिकेच्या कॉन्शिल्स पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तुकाराम महाराज ताजणे, विश्वकर्मा महाराज पांचाळ यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन कोनशिलेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात करीत उपस्थित भाविक, नागरिक, वारकरी यांना इंद्रायणी नदी घाटावर संविधान उद्देशिकेचे वाटप करीत जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्याचा गौरव करीत जीवन चरित्रावर तुकाराम महाराज ताजणे, विश्वकर्मा महाराज पांचाळ यांनी मनोगते व्यक्त करीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आळंदी जनहित फॉउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड अध्यक्ष संदेश नवले, पिंपरी चिंचवड शहर संदेश नवले सोशल फाउंडेशन अध्यक्ष प्रतीक नवले, विश्वम्भर शिंदे यांनी परिश्रम घेतले. आभार अर्जुन मेदनकर यांनी मानले.   

तक्षशिला बुद्ध विहार येथे संविधान दिना निमित्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्यात आले. बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील पठण झाले. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान दिना निमित्त आयु. नामदेव सुरपल्लीकर, आनंद रणदिवे यांनी संविधान मूल्यांवर आधारित मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व, संविधान निर्मितीतील बहुमूल्य योगदान यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

 या प्रसंगी तक्षशिला बुद्ध विहार समिती प्रमुख विश्वनाथ थोरात, विनायक गायकवाड, सुभाष भोसले, बाळासाहेब भोसले, प्रविण रंधवे, भिमराव थोरात, प्रशांत रंधवे, संजय रंधवे, श्रेयस रणदिवे, महेंद्र रंधवे, रोहित थोरात, दिलीप वहिले, विलास रणपिसे, चारुदत्त रंधवे आदी उपस्थित होते. आळंदीत विविध सेवाभावी संस्था, मान्यवर पदाधिकारी यांनी परिसरात संविधान उद्देशिकेचे वाटप करीत संविधान दिनी संविधानाचा जागर केला.

थोडे नवीन जरा जुने