'जागतिक महिला दिन’ निमित्त विशेष सन्मान'


मंगळवार, दि. १० मार्च २०२६

स्थळ : इंदिरा गांधी स्कूल क्रीडांगण, औंधगाव, पुणे

‘जागतिक महिला दिन’ निमित्त समाजासाठी करत असलेल्या कार्याची दखल घेत मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून मला सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सौ. श्रद्धा हृषिकेश गायकवाड, श्री. हृषिकेश दत्तात्रय गायकवाड तसेच जिओ फाऊंडेशनच्या डॉ. प्रिती काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी मा. दत्तात्रय गायकवाड (माजी महापौर) व सौ. संगिता दत्तात्रय गायकवाड (मा. नगरसेविका) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

औंधगाव व परिसरातील महिलांसाठी ‘जागतिक महिला दिन’ निमित्त जिओ फाऊंडेशनच्या सहकार्याने तेजस्विनी प्रस्तुत – होम मिनिस्टर : खेळ पैठणीचा हा आनंददायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या सन्मानाबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार. समाजासाठी असेच सकारात्मक कार्य पुढेही करत राहण्याची प्रेरणा,कौतुकाची थाप या निमित्ताने मिळाली. 


थोडे नवीन जरा जुने