माऊली मंदिरासह पंचक्रोशीत हनुमान जन्मोत्सव साजरा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील माऊली मंदिर, आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट, शनि मारुती मंदिर, काळा मारुती , श्री मारुती देवस्थान, हजेरी मारुती मंदिरासह आळंदी पंचक्रोशीतील विविध श्री हनुमान मंदिरात प्रथापरंपरांचे पालन करीत भाविकांचे उपस्थितीत हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा झाला.
आवेकर भावे रामचंद्र संस्थान यांच्या वतीने श्रीराम मंदिरात हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांसह आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष, आळंदी शहर शिवसेना प्रमुख राहुल चव्हाण यांचे वतीने महाप्रसाद वाटप सेवा रुजू करण्यात आली. श्रीनां रुद्राभिषेख विश्वस्त अर्जुन मेदनकर यांचे हस्ते झाला. या वेळी गोविंद ठाकूर, लक्ष्मण मेदनकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, उदय काळे, बाबासाहेब भंडारे, महेश अयाचित गुरुजी, साहेब महाजन, रामदास दाभाडे, अप्पा महाराज पवार, कृष्णाजी डहाके, हमीद शेख, गौतम पाटोळे, विश्वम्भर पाटील, विलास वाघमारे, डॉ. राजेंद्र जाधव, रोहिदास कदम, नितीन ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी स्वरअन्वय निर्मित महेश देशपांडे यांची प्रस्तुत सुमधुर भक्ती भावगीतांचा सूरसंगीतमय गायन कार्यक्रम उत्साही वातावरणात झाला. या प्रसंगी नाम घेता मुखी राघवाचे अभंग, संत अभंग आणि श्री पांडुरंग, श्री मारुती, श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग गायन सेवा रुजू झाली.
यात गायक महेश देशपांडे, निवेदन रुपाली देशपांडे, गायिका दुर्वा तेली, तबला मयुर खेडकर, शिवनारायण काशीद यांनी पखवाज साथ दिली. हृदयस्पर्शी भक्तीगीत गायन सेवेस भाविकांनी दाद दिली. या वेळी संस्थान तर्फे गायकांचा सन्मान करण्यात आला. धार्मिक वातावरणात हनुमान जन्मोत्सव आळंदी परिसरात साजरा झाला. आळंदी धाम सेवा समितीचे वतीने महाप्रसाद सेवा रुजू झाली.
माउली मंदिरातील प्रथांचे पालन करीत ह. भ. प. बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे कीर्तन झाले. आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवा निमित श्रीना रुद्राभिषेक विश्वस्त अर्जुन मेदनकर यांचे हस्ते झाला. यावेळी पूजेचे पौरोहित्य महेश गुरुजी अयाचीत यांनी केले. माउली मंदिरात श्रीनां रुरअभिषेख पूजा करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. गोपाळपुरातील मारुती देवस्थान चे वतीने हरिनाम गजरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नारायण महाराज जाधव यांचे सुश्राव्य वाणीतून कीर्तन सेवा रुजू झाली. देवस्थानचे अध्यक्ष अप्पा महाराज मोरे यांचे मार्गदर्शनात सप्ताहाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
येथील विविध मठ, मंदिरे आणि धर्मशाळा तसेच परिसरातील पंचक्रोशीत श्री हनुमान जन्मोत्सवाचे सोहळ्यात श्रीचे जीवन चरित्रावर आधारित नामवंत कीर्तनकार, महाराज मंडळींची कीर्तन सेवा, संगीत गायन सेवा ज्ञानभक्तिमय हरिनाम जयघोषात झाली. यात बाळासाहेब महाराज शेवाळे, सोमनाथ भालेकर महाराज, भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविक नागरिकांनी रांगा लावून श्रींचे दर्शन घेतले. श्री हजेरी मारुती मंदिरात जन्मोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आल्याचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी सांगितले. हजेरी मारुती मंदिरातील जन्मोत्सवा निमित्त परिसरात लक्षवेधी मंडप, रोषणाई केल्याने मंदिर परिसर भाविक, नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आळंदी माऊली मंदिर, शनि मारुति मंदिर व हजेरी मारुती, श्री राम मंदिरात पुष्प सजावट लक्षवेधी ठरली.
श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत भालेकर महाराज यांचे कीर्तन हरीनाम गजरात झाले. मारुतीरायाचे दर्शन घेत भाविकांनी श्रींना श्रीफळ अर्पण वाढवीत पूजा केली. या वेळी आळंदीतील विविध मंदिरांत अन्नदान महाप्रसाद वाटप भक्तिमय वातावरणात झाले. रात्री आळंदीकर गावकरी भजनी मंडळाच्या वतीने भजनसेवा रुजू होत आहे. श्री माऊली मंदिरातही हनुमान जन्मोत्सव सोहळा देवस्थानच्या वतीने परंपरेने साजरा झाला.
काळा मारुती मंदिर येथे संतोष महाराज मोझे यांचे वतीने कीर्तन सेवा झाली. वाघमारे परिवार भाविक भक्त यांचे तर्फे महाप्रसाद, आरती झाली. शनी मंदिर, मारुती मंदिर येथे सोमनाथ वाघमारे परिवाराचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवतेज मित्र मंडळाचे वतीने मारूतिरायांची महाआरती, श्रींची पूजा, दूध महाप्रसाद वाटप उत्साहात करण्यात आले. या साठी शिवतेज मित्र मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. इंद्रायणी नगर येथील मारुती मंदिरात आरती, पूजा, कलशारोहन, महाप्रसाद वाटप झाल्याचे अध्यक्ष गणेश रहाणे यांनी सांगितले.
