PCMC : पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन


पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर श्री. योगेश बहल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, “आजच्या दिवशी आपण केवळ महाराजांना अभिवादन न करता, त्यांच्या नैतिकतेच्या व पराक्रमाच्या शिकवणीचा अवलंब केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालून समृद्ध व समर्थ महाराष्ट्र घडवणे, भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करणे, महिलांचा सन्मान राखणे आणि राष्ट्राप्रती निष्ठा ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. शिवराय हे केवळ एक राजे नव्हते, तर ते एक विचार होते. त्यांचे धैर्य, बुद्धिमत्ता आणि प्रजाभक्ती आपल्याला सदैव मार्गदर्शन करत राहील. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या स्वप्नातील समृद्ध, एकसंध आणि स्वाभिमानी भारत घडवण्यासाठी कटिबद्ध होऊया.”

यावेळी ॲड. गोरक्ष लोखंडे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून अत्यंत शिस्तबद्ध राज्यकारभार उभारला. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी योग्य हेतू आणि जिद्दीच्या बळावर त्याचा पराभव करता येतो, हा आत्मविश्वास त्यांनी मराठी माणसाला दिला. स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांची काळजी आणि सर्वधर्मसमभाव ही त्यांच्या स्वराज्याची प्रमुख वैशिष्ट्ये होती. या युगपुरुषाला, रयतेच्या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम.”

या कार्यक्रमास शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, शाम लांडे, विजय लोखंडे, मा. नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे, राजेंद्र जगताप, मायला खत्री, बन्सी पारडे, नगरसेवक जितेंद्र ननावरे, नगरसेविका प्रतिक्षा लांघी-जवळकर, उद्योग व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, अभिजीत आल्हाट, अकबर मुल्ला, गोरोबा गुजर, महिला सरचिटणीस निलम कदम, शहर सरचिटणीस गणेश गायकवाड, प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, सुरविंद्रसिंग बाला, सचिन गायकवाड, अभिजीत आपटे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने