देहूरोड (शिवानंद चौगुले): आर्मी पब्लिक स्टेशन स्कूल देहूरोड ने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या सीबीएसई इयत्ता बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेत भक्ती अभंग हिने ९२.८ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश प्राप्त केले. मानविकी शाखेत आरात्रिका सरकार हिने ९३ टक्के गुण मिळवले, तर वाणिज्य शाखेत प्रणिता कदम हिने ९४ टक्के गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले.
विषयनिहाय गुणवत्तेतही विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. अनुषा आणि कार्तिक गाडे यांनी चित्रकला (Painting) विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. तसेच भक्ती अभंग, भक्ती गुजर आणि खुशी मिश्रा यांनी इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस (IP) विषयात शंभर टक्के गुण मिळवत शाळेचा गौरव वाढवला.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या मेहनत, सातत्य आणि समर्पणाचे कौतुक केले.
