आळंदी : येथील भागीरथी नाला मार्गावी दुरावस्था कायम असून देखभाल दुरुस्ती तत्काळ करण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केली आहे. येत्या काळात माउलींचा पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे. मुख्य नगरप्रदक्षिना मार्गावर असलेला मार्ग पर्याय असल्याने तत्काळ देखभाल दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
एखादा अपघात झाल्यावर प्रशासन जबाबदारी घेणार का असा सवाल त्यांनी केला आहे. पायी वारी आणि पावसाळा याचा विचार करून भागीरथी नाला आणि दगडी पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्ता उताराचा असून तो धोकादायक रहदारीला ठरत आहे. नगरपरिषद प्रशासनाने या कडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. बुरुड समाज धर्मशाळेचे बांधकाम सुरू असून त्यांना प्राधान्याने काम करण्याचे सूचना देणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित संस्थाचा बांधकाम परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
