!-- afp header code starts here --> जुन्नर पोलिसांची उत्तम कामगिरी ; चोरीतील ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून फिर्यादीस परत

जुन्नर पोलिसांची उत्तम कामगिरी ; चोरीतील ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून फिर्यादीस परत


जुन्नर (रफिक शेख) : जुन्नर तालुक्यातील चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी आरोपींना अटक करून सुमारे ३५ लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा दागिने व रोख रक्कम जप्त करत फिर्यादीस परत दिली आहे. या कारवाईमुळे जुन्नर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.


फिर्यादी आसिफ अकबर शेख (वय ३६, रा. चांदपूर पेठ, जुन्नर) यांच्या घरात अज्ञात आरोपींनी कुलूप तोडून प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४५,२४,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला नेला होता. या प्रकरणी जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.


या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपी आयानुद्दीन शेख (वय २०) आणि आबादुद्दीन मुजिबुद्दीन शेख (रा. शिपाई मोहल्ला, जुन्नर) यांना ताब्यात घेतले. सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींकडून ३५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


न्यायालयाच्या आदेशानुसार दि. २ मे २०२६ रोजी हा जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत देण्यात आला. यावेळी आमदार शरददादा सोनवणे, माजी आमदार बाळासाहेब शिरसाठ, तहसीलदार, पंचायत समिती सभापती तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.


ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप मोरे व पोलीस अंमलदारांनी केली. या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

थोडे नवीन जरा जुने