!-- afp header code starts here --> घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी.

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी.

 


 महाराष्ट्र  राज्यातून २२ शहर प्रतिनिधींचा समावेश. 

PCMC 

पिंपरी  - महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांचे विविध प्रश्न आहेत ते सोडवण्याकडे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून कायदा निष्प्रभ करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत, घरेलू कामगारांच्या हक्काच्या लढाईसह घरेलू कामगार कार्यकर्ता परिषदेच्या निमित्ताने आकुर्डी येथे विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली. 

महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आयोजित परिषदेला राजू वंजारे, नवी मुंबई,कामगार नेते काशिनाथ नखाते,ज्ञानेश पाटील ठाणे, कॉ.उदय भट मुंबई, द्रौपदी गवळी लातूर, कल्पना मोहिते सातारा, आशिष शिगवण, विद्या स्वामी सांगली, अनिताताई गोरे पुणे,विद्या स्वामी सांगली, रोशनी गंबीर नागपूर,

वंदनाताई चिंचोलकर उपनगर,शांता खोत नवी मुंबई, धनश्री गोयल डोंबिवली, शहाजी शिंदे धुळे,जीवन दुमाले अकोला, संदीप कोकाटे अहिल्यानगर, लक्ष्मी नाईक कल्याण, विजय खरात पनवेल, संतोष थोरात,मिरा सकपाळे, लक्ष्मी नाईक, कौसल्या इजगज, किरण ठाकरे,संदीप थोरात, स्वप्नील रोकडे आदीसह महाराष्ट्र राज्यातील २० जिल्ह्यातील प्रतिनिधीचा समावेश होता.

राज्यव्यापी कार्यकर्ता परिषदेत मांडून मंजूर केलेले ठराव पुढीलप्रमाणे 

१.घरेलु कामगारांना सर्वंकष कामगार अधिकार देण्याकरिता देशव्यापी सक्षम कायद्याची गरज आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने ILOठरावानुसार  २०२५ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार देशव्यापी कायद्याची गरज अधोरेखित झाली त्यानुसार स्वतंत्र कायदा करावा.

२. सामाजिक सुरक्षा  संहिते मध्ये घरेलु कामगारांची घरेलु कामगार म्हणून स्वतंत्र नोंदणी करत त्यांना राज्य विमा योजना लागू करा.

३.पेन्शन व इतर सामाजिक सुरक्षा घरकामगारांना प्राप्त होईल असा बदल सदर कायद्यात  करा.

४.वेतन संहिता कायद्यामध्ये घरेलु कामगारांचा स्पष्ट उल्लेख करा करून किमान वेतनाची हमी निर्माण करा.

५. घरेलु कामगारांच्या विविध प्रश्नांना, घरगुती हिंसाचार / वेतन वा इतर लाभा बाबत होणारी फसवणुक रोखण्यासाठी समित्या स्थापन कराव्यात.

 ६. नवीन रचना निर्माण होई पर्यंत सध्याच्या मंडळाची अमंलबजावणी व लाभ प्रक्रिया चालू ठेवा.

घरेलु महिला  यांचे हस्ते झाडाला पाणी घालून तसेच चळवळीचे गीत गाऊन परिषदेला सुरुवात करण्यात आली.  परिषदेमध्ये विविध जिल्हा प्रतिनिधी यांनी नवीन कायद्याबद्दल भूमिका मांडल्या. 

प्रस्तावना कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले सूत्रसंचालन अश्विनी मालुसरे यांनी तर आभार माधुरी जलमूलवार  यांनी मानले.

राष्ट्रगीताने परिषदेचा समारोप करण्यात आला.

थोडे नवीन जरा जुने