!-- afp header code starts here --> व्हर्च्युअल टाउन हॉल – ‘ड्रग फ्री पिंपरी चिंचवड’चे धानोरे येथे ऑनलाइन आयोजन उत्साहात

व्हर्च्युअल टाउन हॉल – ‘ड्रग फ्री पिंपरी चिंचवड’चे धानोरे येथे ऑनलाइन आयोजन उत्साहात

 


आळंदी (अर्जुन मेदनकर): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘व्हर्च्युअल टाउन हॉल – ड्रग फ्री पिंपरी चिंचवड’ या जनजागृती उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे येथील राठी सभागृहात ऑनलाइन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकाराने शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. युवकांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवणे, समाजात जनजागृती निर्माण करणे आणि ड्रग्जविरोधी वातावरण तयार करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन इंद्रायणी असोसिएशन आणि आळंदी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, इंद्रायणी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र फणसे, माजी अध्यक्ष राजेंद्र कांबळे, असोसिएशनचे पदाधिकारी व मान्यवर, आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरेचे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाद्वारे अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच युवकांनी व्यसनमुक्त राहून निरोगी, सुरक्षित आणि जबाबदार समाज घडविण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने