ठेकेदारांनी केलेले आरोप महावितरणने फेटाळले

पिंपरी चिंचवड : संदर्भ : ऑनलाईन बातमी ‘महावितरणच्या शहरातील भ्रष्टाचाराला मुंबईतून अभय ? पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचा खळबळजनक आरोप’ दि. ५ ऑगस्ट, २०२६

आपल्या ऑनलाइन वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेली बातमी पूर्णतः चुकीची व दिशाभूल करणारी असून, महावितरण प्रशासन कोणत्याही कर्मचारी व अधिकाऱ्याला पाठीशी घालत नाही. बातमीमध्ये उल्लेख केलेल्या अभियंत्यावर महावितरण प्रशासनाने यापूर्वीच शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. असे असूनही कारवाई करण्यात येत नाही असा आरोप आपल्या बातमीतून करण्यात आला आहे. 

महावितरण मध्ये नवीन वीज जोडणी देण्याची कामे नियमानुसार तांत्रिक बाजू तपासूनच करण्यात येतात व नियमाविरोधी काही काम झालेले आढळले तर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करण्यात येतेच. त्यामुळे ‘मुंबईतून अभय’ असं जे बातमी लिहिलेले आहे ते पूर्णतः चुकीचे आहे. रावेत परिसरामध्ये भावना नदीला महापूर आल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ठराविक भागातली वीजपुरवठा बाधित झाला होता . त्यासंबंधात सुद्धा तेथील स्थानिक अधिकाऱ्याची बदली करण्यात आलेली आहे. तसेच इतरही  दोन शाखाधिकार्‍यांच्या बदल्या वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात अपयश आल्यामुळे करण्यात आलेल्या आहेत.

मात्र काही मंडळी स्वतःची अनाधिकृत कामे करून घेण्यासाठी अनाधिकृत जागेमध्ये महावितरणच्या NSC योजनेतून कामे करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात व महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या वर दबाव आणण्यासाठी वेगवेगळे चुकीचे आरोप करुन दबाव तयार करायचा प्रयत्न करतात. अनधिकृत ठिकाणी महावितरण कंपनीच्या ‘नवीन वीज जोडणी’ योजनेमध्ये किंवा ज्या ठिकाणी तांत्रिक मंजुरी देता येणे शक्य नाही अशा ठिकाणी कामे करून घेण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बदनाम करणे त्यांच्यावर दडपण तयार करणे आणि आपला स्वतःचा हेतू साध्य करणे हा त्यांचा उद्देश आहे. 

परंतु, आपल्यासारख्या माध्यमांनी अशा प्रकारच्या अनधिकृत कामांचे हेतू साध्य होतील व त्यांना पाठबळ मिळेल अशा बातम्या महावितरणच्या खुलाशाशिवाय छापू नयेत अशी आपणास विनंती आहे. 

जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, पुणे परिमंडल.



थोडे नवीन जरा जुने