पिंपरी चिंचवड - क्रांतिसिंह नाना पाटील एक देशभक्त झुंजार नेते महात्मा जोतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराजांचा वारसा निष्ठेने चालवणारे क्रांतिसिंह यांचा सुरुवातीच्या काळात सत्यशोधक चळवळीकडे कल होता. समाजातील अनिष्ठ चालीरीती त्यांना अस्वस्थ करत. अंधश्रद्धा, हुंडा, अस्पृष्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने वतीने आज अभिवादन करण्यात आले.
१९४२ च्या 'चले जाव चळवळीत' ते सक्रीय सहभागी होते. त्यांनी त्यावेळी भूमिगत राहून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यांना अनेकदा तुरुंगवास झाला होता. मात्र त्यानंतर त्यांनी भूमिगत राहून दीड हजार गावांना १९४७ आधीच इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले होते.
छोडो भारत आंदोलनात भूमिगत झाल्यानंतर नाना पाटील यांनी काही सहकार्यांच्या मदतीने सातार जिल्ह्यात इंग्रजांच्या विरोधात प्रतिसरकार स्थापन केले. पोलिस स्टेशन, पोस्ट, सरकारी बँका यावर त्यांनी हल्ला केला. ब्रिटीश शासनाची व्यवस्था बंद पाडून त्यांनी स्वतःची स्वतंत्र व्यवस्था उभी केली. त्यांच्या या कार्यक्षेत्रात जर एखाद्या सरकारी व्यक्तीने सारा वसूल केला, इंग्रजांसाठी हेरगिरी केली, तर त्यांना बेदम मार दिला जात होतो. सर्व सामान्यांचा छळ करणार्या पाटील-तलाठ्यांना तर कोठोर शिक्षा हे प्रतिसरकार करत होते. असेही सांगितले जाते, की ते त्यांच्या पायावर पत्रे ठोकत. यामुळे त्यांच्या सरकारला पत्रीसरकार देखील म्हटले जात होते.
