आळंदी : दिनांक 11/09/2026 रोजी रात्री सुमारे 21.30 वा. आळंदी पोलीस ठाणे हद्दीत एका इसमास जबरदस्तीने किडनॅप करून अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. सदर इसमास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके, कमरेचा बेल्ट तसेच हाताबुक्क्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. मारहाणीमध्ये लोखंडी रॉडने मारल्याने जखमी इसमाचे दात पडले असून, डोक्यात लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने गंभीर स्वरूपाच्या जखमा करण्यात आल्या. तसेच आरोपींनी त्याच्या कानावर वार करून कान कापल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर इसम मयत झाल्याचे समजून आरोपींनी त्यास रस्त्याच्या कडेला टाकून घटनास्थळावरून फरार झाले.
सदर अत्यंत गंभीर घटनेची माहिती मिळताच मा. DCP मारुती जगताप साहेब, झोन-3, मा. ACP योगेश रांजनकर साहेब, मा. ACP Crime सचिन कदम साहेब, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके साहेब, आळंदी पोलीस ठाणे तसेच Crime Unit-3 चे PI कसबे तसेच API सुनील वाघ सो यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे तात्काळ गतिमान करण्यात आली.
DB पथकाचे प्रभारी PSI राहुल दूधमल यांच्या नेतृत्वाखाली HC फुले, PC डिखले, PC डुमनार, PC सूर्यवंशी व PC नरवाडे pc सातपुते HC दोडके यांची तपास पथके तयार करून आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरू करण्यात आला.
आरोपींच्या मोबाईल लोकेशनसह CDR, SDR व इतर तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्याचबरोबर पथकाने रात्रभर विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासून आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला. अथक परिश्रम, अचूक तांत्रिक तपास व योग्य नियोजनाच्या आधारे आरोपींचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला.
अखेर रातोरात मोशी परिसरातून तिन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आळंदी पोलीस ठाण्याच्या DB पथकास यश आले. तसेच गंभीररीत्या जखमी झालेल्या इसमाचा तातडीने शोध घेऊन त्यास YCM हॉस्पिटल येथे दाखल करून वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात आले.
अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात वेगवान प्रतिसाद, तांत्रिक तपास, CCTV विश्लेषण, अचूक नियोजन आणि रात्रभर अथक परिश्रम यांच्या जोरावर अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेणे ही आळंदी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेची उल्लेखनीय बाब आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. DCP मारुती जगताप साहेब, मा. ACP योगेश रांजनकर साहेब, मा. ACP Crime सचिन कदम साहेब व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
अत्यंत गंभीर गुन्ह्यात तात्काळ प्रतिसाद देत, रातोरात आरोपींचा माग काढून त्यांना ताब्यात घेणाऱ्या आळंदी पोलीस ठाण्याच्या DB पथकाचे तसेच सर्व संबंधित अधिकारी व अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
अशाच तत्परता, धडाडी व उत्कृष्ट तपास कार्यातून आळंदी पोलीस ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
