MGID Header Code
Code End

एक सायकल भविष्यासाठी… एका स्वप्नाला नवी दिशा!


काही मुलांच्या स्वप्नांना उंच भरारी घ्यायची असते; पण शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे साधन नसते. ठाकरवाडी, ता. जुन्नर येथील जिल्हा परिषद शाळेतील ३० गरजू मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ‘एक सायकल भविष्यासाठी’ हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.

 आपल्याकडे पडून असलेली एक जुनी सायकल एखाद्या मुलाच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट आणू शकते!

आपण जुनी किंवा नवीन सायकल देऊन, सायकल दुरुस्तीसाठी मदत करून अथवा नवीन सायकल खरेदीसाठी सुमारे ₹६,००० चे सहकार्य करून या उपक्रमात सहभागी होऊ शकता.

चला, दान केवळ वस्तूचे नको, तर एका मुलाच्या स्वप्नांना बळ देण्याचे करूया. कारण सायकल ही केवळ प्रवासाचे साधन नाही, तर शिक्षण, स्वावलंबन आणि उज्ज्वल भविष्याकडे जाणारी वाट आहे!

आपला हातभार, मुलांच्या भविष्याचा आधार!

आवाहक : डॉ. किशोर आण्णासाहेब थोरात

श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था, चिंचवड, पुणे

📞 संपर्क : 8796824682

थोडे नवीन जरा जुने