MGID Header Code
Code End

मोशीमध्ये १२८ मीटर उंच भगवा धर्मध्वज उभारणीचा ऐतिहासिक सोहळा

 

५ हजारांहून अधिक ढोल, १५१ हून अधिक ढोल-ताशा पथकांसह भव्य शंखनाद

४ ऑक्टोबरला ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथे धर्मवीर संभाजी महाराजांना मानवंदना

पिंपरी चिंचवड : मोशी येथे हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ परिसरात १२८ मीटर उंच भगवा धर्मध्वज उभारणीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, रविवार (दि. ४ ऑक्टोबर) रोजी दुपारी २ वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीला मानवंदना देण्यासाठी आयोजित या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ५ हजारांहून अधिक ढोल, १५१ हून अधिक ढोल-ताशा पथकांचा निनाद आणि भव्य शंखनाद असणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून ढोल-ताशा पथके या सोहळ्यासाठी सहभागी होणार असून, त्यांच्या गजरासोबत होणारा शंखनाद वातावरणात चैतन्य निर्माण करणार आहे.

या सोहळ्यासाठी चार भव्य ट्रेलर्समधून ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ परिसरात कार्यक्रमासाठी आवश्यक सामग्री आणण्यात आली आहे. १२८ मीटर उंच भगवा धर्मध्वज उभारणीची तयारी अंतिम टप्प्यात असून, धर्मध्वज उभारणीनंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि शंखनादात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे.

कार्यक्रमात ‘केशव शंखनाद पथका’चाही विशेष सहभाग असणार आहे. हिंदुस्थानातील पहिले विश्वविक्रमी शंखवादकांचे पथक म्हणून उल्लेख असलेल्या या पथकाकडून शंखनादाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे ढोल-ताशांचा निनाद आणि शंखध्वनी यांचा अनोखा संगम या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड व ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना महेश किसनराव लांडगे, अध्यक्ष, हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड यांची आहे. धर्मध्वज उभारणी, हजारो ढोलांचा गजर, १५१ हून अधिक ढोल-ताशा पथकांचा सहभाग आणि विश्वविक्रमी शंखनाद पथकाचे सादरीकरण यामुळे ४ ऑक्टोबरचा हा सोहळा विशेष ठरणार आहे.

रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया - 

“मोशीमध्ये १२८ मीटर उंच भगवा धर्मध्वज उभारणीचा आणि हजारो ढोल-ताशांच्या निनादात होणारा हा सोहळा स्थानिक रहिवाशांसाठी निश्चितच विशेष क्षण आहे. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या माध्यमातून मोशीची  आणि पिंपरी चिंचवड शहराची ओळख आणखी व्यापक होणार असून, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी होणाऱ्या या भव्य आयोजनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.”५ हजारांहून अधिक ढोल,१५१ हून अधिक ढोल-ताशा पथके आणि केशव शंखनाद पथकाचा सहभाग हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भव्य आविष्कार मोशीमध्ये पाहायला मिळणार असून,या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारकांनी आणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन

थोडे नवीन जरा जुने