MGID Header Code
Code End

पिंपरी-चिंचवडमधील शिक्षक दाम्पत्याचा अनोखा उपक्रम! ज्ञानदीप आश्रमातील बालकांना दिला मायेचा घास


देव आणि दर्शन यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक घास मायेचा' उपक्रम; अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर फुलवले आनंदाचे हास्य!

पिंपरी चिंचवड : वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू मुलांसोबत वाटून घेण्याचा सुंदर आदर्श दीपक जाधव सर आणि प्राध्यापिका वैशाली गायकवाड मॅडम यांनी घालून दिला.

आपले चिरंजीव देव आणि दर्शन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ज्ञानदीप आश्रमातील अनाथ बालकांसाठी विशेष अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाला 'एक घास मायेचा' असे भावपूर्ण नाव देण्यात आले.

यावेळी आश्रमातील बालकांना प्रेमाने पोटभर जेवण देण्यात आले. वाढदिवसाच्या आनंदात या बालकांनाही सहभागी करून घेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवण्यात आले. मुलांसोबत वेळ घालवत त्यांना आपुलकी आणि मायेची जाणीव करून देण्यात आली.

या कार्यक्रमाला प्राध्यापक उत्तम कदम, प्राध्यापिका शीला कदम, विलास बाबळ, सुष्मिता गायकवाड, सलीम सय्यद, हेमंत करवे तसेच We Together टीमचे सदस्य उपस्थित होते. सर्वांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि आश्रमातील बालकांसोबत आनंदाचे क्षण साजरे केले.

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःचा आनंद साजरा करताना समाजातील वंचित घटकांचाही विचार करणे गरजेचे आहे. दीपक जाधव सर आणि वैशाली गायकवाड मॅडम यांनी आपल्या कृतीतून हाच सामाजिक संदेश दिला.

'वाढदिवस साजरा करण्यापेक्षा कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हाच खरा आनंद!' या विचारातून राबवलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

एक घास मायेचा… एक सुंदर आठवण, अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य!

थोडे नवीन जरा जुने