विस्डॉम हॉस्पिटल, पुणे बाणेर येथे मोठ्या खर्चाची हृदय शस्रक्रिया पार पडली
पिंपरी चिंचवड - सचिन वावहळ हे अकलूजचे राहीवाशी असून अकलूज रिदम हॉस्पिटलमध्ये प्रथम चाचणी त्यांनी केली असता चाचणीमध्ये असे आढळून आले की यावरती मोठ्या खर्चाची शस्त्रक्रिया करावी लागेल, रुग्णाची परिस्थिती ही गरीब असल्याने सचिन वावहळ यांनी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांच्याकडे उपचारासाठी धाव घेतली, अमोल माने यांनी सर्व रिपोर्ट व रुग्णाची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर विस्डॉम हॉस्पिटल, बाणेर, पुणे येथील
डॉक्टर सुरज चव्हाण यांना तात्काळ फोन द्वारे संपर्क साधला व या मोठ्या खर्चाच्या ऑपरेशन संदर्भात चर्चा केली.
चर्चा झाल्यानंतर लगेच पेशंटला सोमवार विस्डॉम हॉस्पिटल, पुणे बाणेर येथे जाण्यास सांगितले. पेशंट ची व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी करण्यात आली, पेशंटच्या नातेवाईकांनी अमोल माने यांना ऑपरेशन झाले म्हणून फोन द्वारे कळवले समाधान व्यक्त करून आभार मानले मोठ्या खर्चाचे ऑपरेशन झाल्याने पेशंटच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती समाधान दिसून आले.
अमोल माने यांनी सामाजिक कल्याण एवं मानव संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांना फोनवरून सर्व माहिती सांगितली की आमच्या परिचित कुटुंबातील आहेत तरी आपण विस्डॉम हॉस्पिटल, बाणेर येथे जाऊन सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने डॉक्टर सुरज चव्हाण यांचा सत्कार करावा व पेशंटला, पेशंटच्या नातेवाईकांची विचारपूस करा असे सांगितले.
नंतर लगेच पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात सर व पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अमित कोकणे आणि सदस्य आशिष कदम यांनी विस्डॉम हॉस्पिटल, बाणेर येथे जाऊन डॉक्टर सुरज चव्हाण यांचा पुष्पगुच्छ शाल व संस्थेचे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी वरील सर्व पदाधिकारी उपस्थिती होते तर सोबत पेशंट च्या पत्नीही उपस्थित होत्या.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना मानव अधिकार जनजागृती, समाजातील वंचित घटकांना मदत,अत्याचार विरोधी काम करणे, अन्यायाला वाचा फोडने,भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करणे अशा अनेक विषयांवर काम करत असते.
गरिबांपर्यंत सरकारी योजना पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देणे ही संकल्पना सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे हे नेहमीच संस्थेला संबोधित करत असतात तर हा सत्कार केल्याबद्दल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व उपाध्यक्ष तेजस परमार यांनी पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने ,पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व अमित कोकणे आणि आशिष कदम यांचे कौतुक केले.