पिंपरी चिंचवड : श्री गजानन सत्संग मंडळ चिंचवड येथे विद्यार्थी गुणगौरव समारोह संपन्न


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) -  श्री गजानन सत्संग मंडळ चिंचवड या संस्थेतर्फे इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रम आज दिनांक 29 जून 2025 रोजी श्री गजानन महाराज मंदिर चिंचवड येथे अत्यंत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला 

आजच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभासाठी श्रद्धा कुलकर्णी मराठे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

  श्रद्धा कुलकर्णी मराठे  या मानवी संसाधन व्यवस्थापन नेतृत्व प्रशिक्षण शैक्षणिक संशोधन या क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या तसेच त्यांनी पीएचडी इन लीडरशिप बिहेवियर पदवी देखील प्राप्त केली आहे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी गेस्ट स्पीकर म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे त्यांचा मंडळाचे अध्यक्ष  विश्वनाथ धनवे व उपाध्यक्ष किशोर कदम यांनी सत्कार केला.

 कार्यक्रमाची सुरुवात श्री संत गजानन महाराज यांच्या नाम गजराने करण्यात आली याप्रसंगी श्री गजानन सत्संग मंडळ या संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध धार्मिक, शैक्षणिक,सामाजिक, वैद्यकीय, उपक्रमांची विस्तृत माहिती देण्यात आली.

 कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रद्धा कुलकर्णी मराठे यांनी अत्यंत वेगळ्या शैलीमध्ये विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला अनेक प्रकारचे उपक्रम त्यांनी विद्यार्थी व पालकांच्या सहभागाने केले विद्यार्थ्यांची विचार करण्याची पातळी तसेच एखाद्या गोष्टींमध्ये सहभागी होण्याची कला याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना खूप वेगळ्या  शैलीमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन अनेक विषयांवर विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.

  प्रत्येक व्यक्तीने  आपल्या आयुष्यात कितीही संकट आणि अडचणी आल्या  तरीही आपल्या आयुष्यातील ज्या चांगल्या आणि सकारात्मक बाबी आहेत त्याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. असे विद्यार्थी पालक आणि जमलेल्या सर्व भक्तगणांना मार्गदर्शन केले.


 आजच्या श्री गजानन सत्संग मंडळाच्या या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक  सुरेश भोईर, अपर्णा डोके, राजेंद्र गावडे, तसेच

 अश्विनी चिंचवडे या  उपस्थित राहिल्या होत्या, त्यांचाही सन्मान संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आला.

 यानंतर इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुक व बक्षीस वितरण सोहळा व्यासपीठावर संपन्न झाला तसेच अन्य विद्यार्थ्यांनाही बक्षीस वितरण करण्यात आले.

बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्यांचे व माजी नगरसेवकांचे तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल पालक विद्यार्थी तसेच समाजातील अनेक शैक्षणिक वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उपस्थितांचे  व सर्वांचे सहकार्याबद्दल मंडळाचे उपाध्यक्ष श्री किशोर कदम यांनी आभार मानले.

 आजच्या या कार्यक्रमाचे नियोजन श्री गजानन सत्संग मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे उपाध्यक्ष किशोर कदम कार्यवाह  प्रताप भगत सहकार्यवाह  श्रीपाद जोशी, खजिनदार विष्णु पूर्णये  विश्वस्त दत्तात्रेय सावकार, संजय खलाटे, देवीदास कुलथे, श्रीकांत आणावकर, महेश गोखले व सचिन बलकवडे तसेच मंडळाचे कायदेशीर सल्लगार श्री धनंजय कुलकर्णी यांनी केले.

 आजच्या या विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन श्रद्धा कुलकर्णी इनामदार यांनी अत्यंत खूमासदार शैलीमध्ये केले.

थोडे नवीन जरा जुने