SBI PO Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँक (State Bank of India) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SBI Bharti
रिक्त पदांची संख्या आणि तपशील
भारतीय स्टेट बँक अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या एकूण 541 रिक्त जागांसाठी उमेदवारांना संधी आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार कोणत्याही शाखेतील पदवी असणे अपेक्षित आहे. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात) सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा.
तसेच उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली असून SC/ST: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क आणि वेतनमान
भारतीय स्टेट बँक अंतर्गत अर्ज करण्यासाठी जनरल/ओबीसी/EWS उमेदवारांसाठी 750 अर्ज शुल्क असणार आहे. तर SC/ST तसेच PWD साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 ते 85,920 पर्यंत पगार मिळेल.
अर्ज प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा. तसेच नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही असू शकते.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 जुलै 2025 असल्याने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे. या पदासाठीची पूर्व परीक्षा: जुलै/ऑगस्ट 2025 तर मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2025 होणार आहे.
अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा
शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2025
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.