पुणे : मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आज कोंढवा येथे खासदार अमोल कोल्हे व राष्ट्रवादी शरद पवार अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्रम खान यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हे यांनी मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी कोंढवा येथील कत्तलखान्याचा प्रश्न, मुस्लिम व कुरेशी समाजातील विविध छोट्या व्यवसायिकांचे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यांक आघाडी शरद पवार गटाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्रम खान यांनी केले होते.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्रम खान, आरिफ चौधरी, अस्लम कुरेशी, सलीम लाला, शाकिब सय्यद, रोहन गायकवाड, आरिफ पटेल, अहमद खान, अन्वर कुरेशी यांसह पुणे शहरातील मुस्लिम व कुरेशी समाजाचे पदाधिकारी, व्यावसायिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.