पिंपरी चिंचवड : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे या सामाजिक संस्थेने राबविलेल्या ' पैसे नको,रद्दी द्या' या अभिनव उपक्रमास पिंपरी चिंचवड शहरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत सुमारे पाचशे किलो रद्दी दान हे वात्सल्य मतिमंद मुलांच्या निवासी शाळा, देहूगाव येथे देण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व अमित कोकणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर,सदस्य आशिष कदम व संस्कृती थोरात आदी उपस्थित राहून कार्यक्रम पार पडला.
वात्सल्य मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये पंचावन्न अनाथ,निराधार मुल आहेत ज्यांचा सांभाळ करणेसाठी भरपूर खर्च येत असतो तर सामाजिक भावनेतून हा उपक्रम रद्दी दानाच्या माध्यमातून घेऊन ही मतिमंद मुले या रद्दीपासून मशीन मध्ये क्रश करून तिचे काचेच्या वस्तू पॅकिंग करणेसाठी वापर केला जातो व तिला दुप्पट भाव मिळतो, अशा या रद्दीच्या दानाने त्यांचे काही खर्च भागतात व मुलांना काम पण मिळते.
असा हा अभिनव उपक्रम आपण पुढेही असेच चालू ठेऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून रद्दी फक्त एकदाच न देता नेहमीच देणार आहोत.
त्याव्यतिरिक्त अजूनही बाकीच्या म्हणजेच दिवाळी साहित्य विक्री,पर्यावरण पूरक गणपती मूर्ती विक्री आणि राखी विक्री अशा या मतिमंद मुलांना आधारभूत ठरणाऱ्या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी सांगितले.
उपस्थित सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे येथील पदाधिकारी व सदस्य यांनी मागील आठ दिवसात रद्दी गोळा करण्याचा निश्चय करून तो गरजूपर्यंत पोहोचण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि ते आजच्या या उपक्रमातून सफल पण झाले. संस्थेच्या मार्फत मतिमंद मुलांना केळी चे वाटप करण्यात आले व सर्व रद्दी दात्यांचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे यांनी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था मानव अधिकार साठी काम करत असताना सामाजिक उपक्रमात पण अग्रेसर असते व असे उपक्रम घेण्यासाठी मार्गदर्शन संस्थेचे राष्टीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांच्या मार्फत वेळोवेळी केले जाते असे संस्थेच्या पुणें टीम कडून सांगण्यात आले.
पुणे टीम ने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल संस्थेच्या वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले तर असा हा स्तुत्य उपक्रम सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना संस्थेच्या ' पैसे नको ,पण रद्दी द्या' या उपक्रमात सहभागी होऊन आपणही रद्दी दान करू शकता असे आवाहन संस्थेच्या पुणे टीम कडून कारण्यात येत आहे.त्यासाठी आपण किशोर थोरात ८७९६८२४६८२ ,अमित कोकणे ९३०७७१२५५० व महेंद्र शेळके ९६५७७१४१७१ यांना दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून सहभाग घेऊ शकता.
संस्थेचे पुढील महिन्यात काळाची गरज असलेला वएक झाड, भविष्यासाठी' हा वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याने अपणही यात सहभागी होऊ शकता.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ संस्थेचे या उपक्रमाबद्दल वात्सल्य संस्थेचे संस्थापक विलास देवतरसे यांनी आभार मानले व वात्सल्य संस्थेला आपल्या सारख्या संस्थांची मदतीची गरज असल्याचेही सांगितले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून असा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे कौतुक केले जात आहे.