पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र चाकण, यांच्या वतीने आज रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे मनोज पाटील प्र.सहाय्यक कल्याण आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रमा करीता प्रमुख पाहुणे वृक्षमित्र आण्णा जोगदंड गुणवंत कामगार शंकर नाणेकर गुणवंत कामगार दत्तात्रय दगडे गुणवंत कामगार यांच्या उपस्थित होते. वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कामगार वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला सदर प्रसंगी विविध जातीची दुर्मिळ औषधी तसेच ग्रामपंचायतीला उत्पन्न देणारी उपयुक्त अश्या 50 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी नागेश दळवी, नितीन पाटील, तान्हाजी दरेकर, पाटिलबुवा गव्हाणे, अविनाश वाडेकर,संभांजी येळवंडे, प्रकाश पटारे,भरत उढाणे व सदाशिव आमराळे या़नी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन कामगार कल्याण के़द्र चाकणचे केंद्र संचालक अविनाश राऊत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.