पिंपरी चिंचवड : घरकुल भाजी मंडईत सोयी- सुविधासाठी आंदोलन

 


पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या सेक्टर नं१७ व १९ घरकुल  येथे भाजी मंडई हॉकर झोन निर्माण करण्यात आले. येथे कोबा करण्यात आला मात्र सदरच्या ठिकाणी पत्र्याची  शेड करावे,ओटे निर्माण करून द्यावेत, लाईट, पाणी द्यावे या मागण्यासाठी फ क्षेत्रीय  कार्यालयावर नॅशनल हॉकर फेडरेशन,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने मोठ्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. 

कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या मार्गदर्शनात झालेल्या आंदोलनामध्ये मा. नगरसेवक मारुती भापकर, महिलाध्यक्षा वृषाली पाटणे, मनपा समिती सदस्य किसन भोसले, सलीम डांगे, नंदा तेलगोटे, राजू बिराजदार, सुरज देशमाने, सचिन  नागने, जुबेर शेख, बरगल्ली गावडे, माधुरी जलमुलवार, विनायक लाटे, सुनील भोसले, शेखर पाटील, राजेश माने, नवनाथ जगताप, शमशुद्दीन शेख, शारदा राक्षे, बळीराम स्वामी, आशा बनसोडे, बबिता बनसोडे , अशोक सुकणे, सीमा गायकवाड, विद्या झेंडे, बाबुराव कस्तुरे, शारदा वानखेडे, सविता हिंगणकर, श्रीहरी खत्री, राजाभाऊ हाके, भगवान तेलगोटे, लाला राठोड, सहदेव होनमाने, फरीद शेख, मंगेश पालके, नंदू आहेर, संदीप भोसले, मुमताज शेख,आदीसह पथ विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून फ क्षेत्रीय कार्यक्षेत्रात असणाऱ्या सेक्टर नंबर १७ व १९ घरकुल चिखली  प्राधिकरण येथे सुमारे ६२५० घरांचा गृहप्रकल्प महानगरपालिकेकडून करण्यात आला.  येथे असणाऱ्या नागरिकांसाठी    सन २०२२ तत्कालीन आयुक्त राजेश पाटील व क्षत्रिय अधिकारी राजेश बहुरे यांचे आदेशाने  मध्ये भाजी मंडई  हॉकर झोनची निर्मिती करण्यात आली.  येथे काही कालावधीनंतर विक्रेते यांना पावसाचा व उन्हाचा त्रास सहन करावा लागत होता त्यानंतर भाजी विक्रेत्यांच्या मागणीनुसार येथे कोबा,  फ्लोरिंग करून देण्यात आले.  

मात्र पत्र्याचे शेड,साहित्य व  बसण्यासाठी ओटे, लाईट पाणी तसेच महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह  या मागण्या वारंवार करून ही महानगरपालिका सदरचे काम करून देत नव्हती म्हणून सदरच्या विक्रेत्यांना  हॉकर झोनच्या बाहेर  व्यवसाय करावा लागत होता तो टाळण्यासाठी सदरच्या हॉकर झोन मध्ये सोयी सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.

यावेळी चर्चा करण्यासाठी पोलीस प्रशासनाने  शिष्टमंडळास घेऊन फ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांची भेट घडवून दिली त्यांना निवेदन दिले.

यावेळी सदरच्या मागण्यावर चर्चा झाली  तसेच पथविक्रेता प्रमाणपत्र केवळ क्षत्रिय कार्यालयातच द्यावे अशा मागण्यावरती श्री पाटील यांनीं   आपले प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करून सदरच्या ठिकाणी सोयी सुविधा देण्याबाबत भूमी आणि जिंदगी विभाग आणि क्षत्रिय कार्यालयाकडून  कार्यवाही सुरू करू अशी आश्वासन दिले.

थोडे नवीन जरा जुने