पिंपरी चिंचवड - श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ.

 


 पिंपरी चिंचवड - चिंचवड, शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

 सदर कार्यक्रम एआयसीटी  व प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कल्याण चे संचालक प्रा.अमेय महाजन यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ए आय सी टी  संचालक प्रा. राजेश सप्रा हे होते, प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक  मारुती भापकर, भास्कर रिकामे, कल्याणी भावसार  इ. इत्यादी उपस्थित होते. 

या याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. अमेय महाजन म्हणाले की मुलाचा कल पाहून त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे क्षेत्र निवडू द्यावे. पालकांनी आपले मत मुलांवर लादू नये. एनडीए, मिलिटरी स्कूल, मर्चंट नेव्ही, पायलट  इ. क्षेत्रात  मराठी मुलं कमी दिसतात. वास्तविक पाहता हे सर्व शिक्षण देणाऱ्या संस्था महाराष्ट्रातच आहे. यावेळी विधार्थी व पालकांशी त्यांनी संवाद साधला. अनेक प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरं दिली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी प्रास्ताविक केले.

 गुणगौरव समारंभ घेण्यामागचा हेतू त्यांनी विशद केला. त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ए आय सी टी  च्या कल्याणी भावसार मॅडम यांनी त्यांच्या इंटिरियर डिझायनर या इन्स्टिट्यूटची माहिती दिली.

 याप्रसंगी प्रमुख पाहुणे असलेले मारुती भापकर, भास्कर रिकामे यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले. प्रतिष्ठान व एआयसीटीच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह  व व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन सारिका रिकामे व  तेजस्विनी बडे यांनी केले. आभार प्रदर्शन हरि नारायण शेळके यांनी  केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने