पिंपरी-चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : एचसीएमटीआर रस्त्यासह नवीन विकास आराखड्यातील सर्व कालबाह्य आरक्षणे रद्द करून, येथील रहिवाशांच्या जमिनी फ्री होल्ड करण्यात याव्यात आणि त्यांना घराचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी कर्मचारी संघर्ष चळवळीच्या वतीने चिंचवड स्टेशन ते महापालिका भवन असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे मुख्य समन्वयक धनाजी येळकर पाटील, शिवाजी इबीतदार, सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक मारुती भापकर, बाबा कांबळे, अजित शेख, संजय जाधव, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, सतीश काळे, मराठवाडा जनविकास संघाचे अरुण पवार, मनोज पाटील, किशोर पाटील, राजश्री शिरवळकर, अर्चना मेगडे, ज्योती भालके, देवेंद्र भदाणे, सतीश नारखेडे, अॅड. प्रतिभा कांबळे, गणेश सरकटे, देवेंद्र खोकर, विद्या पंडित, शिवाजी पाटील, रमेश पिसे, बालाजी ढगे, रामचंद्र ढेकळे, रामलिंग तोडकर, छावाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिंदे, विष्णू बिरादार, निशा काळे, अश्विनी पाटील, पल्लवी साळुंखे, चंद्रकला नवाडे, यशोदा पवार, फरीदा कुरणे, रावसाहेब गंगाधरे, शशिकांत आवटे, इरफान शेख यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान आंदोलकांनी, कालबाह्य आरक्षणांमुळे नागरिकांचे हक्क व विकास प्रलंबित राहत असल्याचा आरोप करत, महापालिकेने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी केली.